पडद्यामागचा हिरो “बाप” father is real hero in the life
खरच बापाला तोड नसते, दिवसभर राब राब राबतो एकाच अपेक्षेने की मी इतके गरिबीचे दिवस पाहिलेत ते माझ्या मुलांनी नको पाहायला.
आपण फाटके कपडे घालून जायचो शाळेत मुले मुली चिडवायची लाज वाटायची पण परिस्थिती आपली गरिबीची होती त्यावेळेस म्हणून काय करू शकलो नाही पण माझ्या मुलांना नको कुणी हसायला,नको त्यांची चेष्टा उडवायला मुले मुली चिडवितात म्हणून नको त्यांची शाळा बुडायला. त्यांनी शिकून खूप मोठं व्हावं.
भले दररोज नसले नविन कपडे पण निदान अंगावर चांगले कपडे हवेत फाटलेले कपडे त्यांच्या नशीबात नकोत या साठी बाप दिवसभर घाम गाळतो.
स्वताचा शर्ट बनियान फाटलेला असेल पण नको मला सवय आहे फाटलेले कपड्यांची पण मुलांच्या अंगावर नको म्हणून स्वताला शर्ट बनियान न घेता मुलांसाठी नविन कपडे घेतो चांगले शिक्षण मिळावे म्हणून दिवसभर काम करून रात्रपाळी करतो. मुले आरामात झोपलेली असतात त्यांना असे आरामात झोपलेले पाहून थकलेल्या बापास खुप आनंद होतो. एक नविन उर्जा त्यांच्या अंगात संचारते ती ही की, माझ्या कष्टामुळे मुले सुखात आहेत. आणि. ते समाधानाचे सुख आपल्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर पाहून बाप आपली सारी दुःख कष्ट विसरतो. स्वतः पायी प्रवास करून रात्रंदिवस उभं राहून पायाला जखमा होतात भेगा पडतात, पण बापाला त्याची पर्वा नसते. पण आपल्या मुलाने बाईक मागितलीय त्याला शाळेत जायला यायला त्रास होतो उशीर होतो पाय दुखतात पायी चालून म्हणून स्वताच्या पायातून येणाऱ्या रक्ताकडे सुद्धा तो दुर्लक्ष करून मुलांच्या बाईक साठी कर्ज काढतो. गुरा सारखं राबतो. मुलांच्या सुखात स्वताचे दुःख,आशा अपेक्षा सर्व काही विसरतो कारण स्वताची स्वप्न बाप मुलांमधे पाहत असतो स्वताचे शिक्षण नाही झाले स्वताला पोटभर खायला चांगले अन्न नाही मिळाले . म्हणून मुलांच्या चांगल्या खाण्याकडे, सकस आहाराकडे तो लक्ष देतो. स्वताची भूक मारतो, तब्येत बिघडली असताना उगीच खर्च नको म्हणून बाप दवाखान्यात जात नाही पण मुलांना काही झाले तर त्याचा जीव बारीक होतो तळहातावरील फोडा प्रमाणे जपलेली मुलं त्यांना प्राणा पलीकडे जपतो, रक्ताच पाणी होईपर्यंत राब राब राबतो .
मुलांना मोठी करतो पण हेच मुलं मोठी झाल्यावर मग बापाला उलटून बोलतात कुणासमोरही अपमान करतात. एवढे करूनही मुले अशी वागतात बोलतात ते सहन होत नाही म्हणून एखादा बाप जीव देतो तर एखादा बाप हा अपमान ही पचवतो असे समजून की लेकरांना अजून कळत नाही. माझी गरज आहे त्यांना अजून. मी जीव दिला तर आजच हे उघडे पडतील. मग कष्ट कोण करेन मुलांना नोकरीला कोण लावेन म्हणून अपमानही पचवितो.
मुलांना नोकरी धंद्याला लावतो मुलांची लग्न करतो आणि आपले कर्तव्य पूर्ण करतो.
पण स्वताचे आराम करण्याचे दिवस असताना मुले आपापल्या बायकांना घेऊन वेगळी होतात. तुमचं करू की माझा संसार पाहू म्हणत पून्हा त्या बापावर भीक मागण्याची वेळ आणतात .पुन्हा तो बाप कुणाचा तरी सालदार, राखणदार बनून रक्ताळलेल्या, घायाळलेल्या मनाने मरणाच्या दिवसांची वाट पाहात असतो. कारण जगण्या सारखे त्याच्या जवळ काही उरलेले नसते. आत्महत्या करून मरण्याची त्याची इच्छा नसते. भोग आहेत भोगावेच लागतील म्हणून जगत असतो. अशा ह्या पडद्या मागच्या बापाची हिरोगिरी कुणालाच दिसत नाही, कळत नाही. ज्यांना कळते ते सुखात राहतात, ज्यांना नाही कळत ते आयुष्यभर नारायण नागबली, पिंडदान करीत राहतात, जीवंत पाणीच बापाला मान देऊन आदराने बोलणे शिका.नंतर कितीही प्रयत्न केला पण नजरे आड झालेला बाप दिसत नाही