शालेय जीवनामध्ये शिक्षकासाठी व विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ हृदयस्पर्शी मराठी भाषण Farewell ceremony 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय जीवनामध्ये शिक्षकासाठी व विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ हृदयस्पर्शी मराठी भाषण Farewell ceremony

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकदा वेळ येते जेव्हा आपल्या प्रियजनांना सोडून जावे लागते अशा वेळेस बऱ्याचदा निरोप समारंभाचे आयोजन केले जाते आपण खूप सार्‍या मित्रांना प्रश्न पडतो की निरोप समारंभासाठी काय बोलावे आणि काय बोलू नये यासाठी सुंदर असे भाषण आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहोत शालेय असेल तसेच सेवानिवृत्तीचा असेल कोणताही निरोप समारंभ म्हटला की भाषण आलेच आणि ते भाषण परिणामकारक होण्यासाठी सुंदर रीतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता.

शालेय जीवनामध्ये तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये सातवी आठवी दहावी बारावी अशा वर्गांमध्ये असताना आपल्याला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेस आपण भाषण कसे सादर करायचे भाषणामध्ये मुद्दे कोणते असले पाहिजेत त्यानंतर कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे अशा प्रकारचे सोपे सुटसुटीत सुंदर सुलेखित मुद्देसूद भाषण आपल्याला आले पाहिजे आणि ते येण्यासाठी सदर लेखांमध्ये मी आपल्यासमोर सुंदरतेने भाषण सादर करत आहे निरोप समारंभ हृदयस्पर्शी भाषण.

निरोप समारंभ भाषण हृदयस्पर्शी भाषण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार येथे जमलेल्या माझ्या सर्व आदरणीय शिक्षक गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो माझे नाव……. आहे आज मी तुम्हाला निरोप समारंभ विषयीचे भाषण करणार आहे मला आशा आहे की आपण सर्वजण मला ओळखतच आहेत आज आपण सर्वजण या ठिकाणी निरोप समारंभासाठी एकत्रित जमलेलो आहोत.

आज या ठिकाणी फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्यासोबत शिक्षण घेणाऱ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना सर्व मंडळींना व आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत भावनिक असा दिवस आहे आज नंतर कदाचित आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल याची शक्यता कमीच आहे कारण आज नंतर प्रत्येक जण आपल्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शिक्षणासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाणार आहेत काही जण नोकरी करण्यासाठी जातील तर एकंदरीत आपण सर्वजण एकमेकांपासून दूर जाणार आहोत आणि सोबत राहतील त्या फक्त आपल्या आठवणी राहणार आहेत फक्त त्या आठवणी गोड कडू आणि खोडकर अशा सर्व आठवणी आपण सोबत घेऊन जाणार आहोत नक्कीच आपल्याला या आठवणी पाठवणार आहेत.

मला आज आवर्जून असे वाटते की जसे माझ्या आयुष्यातून काहीतरी अत्यंत महत्त्वाचे निष्टून जात असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे खरे पाहिले तर काहीतरी नाही तर खूप काही सुटत आहे आणि कदाचित आयुष्याचं आयुष्यात सुटत आहे मला अजूनही तो महाविद्यालयांमधला पहिला दिवस आठवतो जेव्हा मी अतिशय शांतपणे बसलो असताना डोळ्यांमध्ये एक प्रकारची भीती कदाचित अश्रू पण द्यायचे आश्चर्याची गोष्ट आहे आज सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत परंतु आजच्या अश्रूंचे कारण भय नाही तर असू यासाठी आहेत की तुम्हा सर्वांसोबत जो वेळ मी घालवला तो मला परत कधीच आयुष्यात वापस येणार नाही मित्रांनो माझ्या आयुष्यात एक आई-वडील आणि दुसरे गुरुजन आणि तुम्ही सर्वजण ज्यांना मी कधीही विसरणार नाही.

तुमच्या सर्वांचे अत्यंत हृदयापासून मी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही मला खऱ्या अर्थाने जगणे शिकवले जर माझ्याकडून अनावधानाने कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर कुणाचे मन दुखावले असतील कुणांना कुणाला मी उलटून बोललो असेल कुणाशी भांडण देखील केले असेल तर मला त्याबद्दल तुम्ही माफ करताल त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो तुम्ही मला क्षमा करावी शेवटी परमेश्वराला ही प्रार्थना आहे आपण सर्वजण जिथे ही जाणार आहात ज्या ठिकाणी नोकरी करणार आहात तेथेही तुम्ही आनंदाने राहाल सुखाने राहाल आणि आयुष्यात खूप मोठी प्रगती कराल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो.

Farewell ceremony
Farewell ceremony

10 वी 12 वी निरोप समारंभासाठी मराठी भाषण

सहवास सुटला म्हणून

सोबत सुटत नसते

आणि नुसता निरोप दिल्याने

नाते तुटत नसते

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष माझे गुरुजन वर्ग तसेच इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो काही वर्षांपूर्वी आपण या महाविद्यालयात आलोत या महाविद्यालयाचा छोटा वृक्ष वृक्षाखाली आपण विसावलो आज त्या वृक्षा खाली बसून आपण ज्ञान मिळवली तेच पक्षी आज आपणासमोर निरोप देण्यासाठी उभे आहेत.

जीवनामध्ये अनेक आठवणी असतात आठवण येतात अनेकांच्या मनामध्ये आपल्या विषयीची भावना बनवली जाते हसत खेळत दिवस निघून जातात मागे राहतात त्या फक्त आठवणी असतात प्रत्येकाला असा एक क्षण येतो प्रत्येकाला सोडून जावेच लागते त्या मागचे कारणही खूप वेगळे असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष ठरलेलाच असतो इथून पुढे जात असताना आपण व्यवसायाच्या मार्गाने कोणी जाईल कोणी नोकरी राजकीय दृष्टीने समोर जाईल.

वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल

पंखा भरलेल्या विचार बळाने

भरारीला सिद्ध व्हावे लागेल

आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशी झाली आहे अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर येत आहेत

घेताना आज निरोप शाळेचा

आले भरून या डोळे

शाळेतील दिवस बनले

मरणाच्या पुस्तकातील पाणी

काही वर्षांपूर्वी माझ्या या शाळेत आगमन झाले आणि मी या शाळेमध्ये रमून गेलो कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्यामध्ये आपला जीव ओतून ते मडकं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो त्याची जडणघडण करतो त्याच्यावरती चांगली संस्कार करतो म्हणून घडलेलं मडकं हे सुंदर रीतीने दिसते त्याप्रमाणे शिक्षक वृंदा देखील गुरुजन वर वर्ग देखील आपल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतो आपले जडणघडण करत असतो आपल्या विचारांमध्ये नाविन्यता आणतो सर्जनशीलता आपल्यामध्ये रुजवतो आणि एक चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व बनवण्याचे काम आपले गुरुजन करत असतात शिल्पकार ज्या पद्धतीने ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक गुरुजन एक उत्तम शिल्प तयार करण्याचे काम करत असतो या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजींन उत्तम संस्कार केले अभ्यासाबरोबर इतर गोष्टी देखील आमच्यामध्ये रुजवण्याचा उत्तम प्रयत्न केला कला असेल क्रीडा असेल साहित्य असेल खेळ असेल अशा अनेक वेगवेगळ्या कौशल्यांचे आमच्यामध्ये रुजवणूक केली 21 व्या शतकामध्ये माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले.

सुरवंटाचे झाले

सर्वत्र लागले भराऱ्या मारू

नवे जग नवी अशा

शोध घेण्याची जबर मनीषा

याच शाळेने लावले वळण

त्यावर चढू यशाची चढण

हीच माझी शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समूहगीत बालगीते शिकलो प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाया भक्कम केला आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग येत आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या जागी घट्ट नाती संबंध निर्माण झाले आहेत या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो एकत्र जेवण केली एकत्र अभ्यास केला एकत्र राहून सर्व धर्म समभाव प्रमाणे जसे राष्ट्रभक्ती असेल वृक्ष प्रेम असेल पर्यावरण संवर्धन स्वच्छता मोठ्यांचा आदर सर्जनशीलता नाविन्यता जिज्ञासूर्ती एकमेका सहकार्य वृत्ती वेळेचे बंधन स्नेहसंमेलन अशा गोष्टी या शाळेत आम्ही शिकलो त्याचबरोबर सहल सहल असेल स्नेहसंमेलनातील विज्ञान प्रदर्शनी असतील व्याख्याने असतील विविध स्पर्धा या दरम्यान आम्ही खूप मोठे अनुभव घेतले आणि आज एक सुंदर रीतीने व्यक्तिमत्व घडवून घेतले ज्या शिक्षकांनी आम्हाला यात हे ज्ञान देण्याचं काम केलं त्या शिक्षकांना मी माझे शतशः प्रणाम

शालेय जीवनामध्ये शाळेमध्ये थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी केल्या यामध्ये आम्ही व्याख्याने भाषणे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेतल्या गेल्या यामध्ये आम्ही भाग घेतला आमच्या शिक्षकांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले थोर नेत्यांचे थोर महापुरुषांचे विचार आमच्या मध्ये रुजवण्याचं काम आमच्या शिक्षकांनी केलं स्पर्धा परीक्षा असेल स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके असतील कोणताही प्रश्न विचारला तर शिक्षकांनी आमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला शालेय जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही शाळेमध्ये मी गणित शिकलो विज्ञान शिकलो, विज्ञानाचे प्रयोग शिकलो प्रयोग प्रत्यक्ष करण्याची संधी आमच्या शिक्षकांनी आम्हाला उपलब्ध करून दिली या शाळेत मी फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचे गणित कसे सोडवावे हे देखील शिकलो केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा मराठी वर प्रेम करायला शिकलो.

गाठली जरी आम्ही भव्यदिव्य शिखरे

आमची तू जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे

देऊनी बळ पंखांना तू करिते प्रति पाळा

सर्वाहून निराळी माझी शाळा माझी शाळा

अशाप्रकारे त्या शाळेने आम्हाला घडवले आम्हाला सुंदर रीतीने जगणं शिकवलं आमच्या गुरुजनांनी आमच्यावर चांगले संस्कार केले येणाऱ्या भविष्यात आणि भविष्यातील आयुष्यात आम्ही येथील संस्कार पुढे घेऊन जाण्याचे काम करणार आणि चांगल्या रीतीने जीवन जगू आणि जीवनामध्ये यश संपादन करू आणि आमच्या शिक्षकांचे गुरुजनांचे आमच्या आई-वडिलांचे नाव मोठे करू एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत घ्यायचा

Leave a Comment