आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बदलुन गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment for inter district transfer
उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांचेकडील पत्र क्र. विआशा/आस्था- 4/1204339 दि.11.01.2024 नुसार, त्यांच्याकडे आलेल्या विविध निवेदनाबाबत, आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद, कर्मचाऱ्यांना शासन निर्देशानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळण्याबाबत, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रकांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयास निर्देशित केले आहे. वाचा क्र. 01 च्या शासन निर्णयामध्ये आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलुन गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शुन्य होत असल्यामुळे त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांची पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, ग्राम विकास विभागाकडील दि. 31.10.1989 च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्ष सेवा झालेली असावी, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दि. 31.10.1989 च्या शासन आदेशानुसार असावी असा उल्लेख आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने प्रस्तुत जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे? या बाबत निर्णय घेणेकामी खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :
सचना :-
1. वाचा क्र. 01 येथे नमूद केलेल्या शासन निर्णयामध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलुन गेलेल्या/ आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढ देणे बाबतची योजना पाचव्या वेतन आयोगामध्ये अस्तित्वात होती.
2. 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, दि. 01.01.2006 पासुन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी देण्यात आली असुन वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार एक अथवा दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे.
3. यास्तव, ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 6 व्या वेतन आयोग लागु झाल्यानंतर म्हणजेच दि. 01.01.2006 नंतर झालेली आहे व ते 6 वा वेतन आयोग लागु झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेमध्ये हजर झालेले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय ठरत नाही. त्यामुळे उक्त वाचा क्र. 01 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देवुन अशा प्रकारची आगाऊ वेतनवाढ देण्यात येवू नयेत.
यावे.
4. सदरचे परिपत्रक आपले अधिनस्त सर्व खाते प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणुन देण्यात