आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment
Extra increment शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन आदेश क्र. लोआप्र-2002/प्र क्र.63/आस्था-5. मंत्रालय, मुंबई दि.03.10.2003
सातारा जिल्हा परिषदचे पत्र
👉PDF download
Extra increment 3. ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र.माअअ-2023/प्र क्र.2023/प्र क्र. 353/आस्था-4 दि.05.09.2023
उपरोक्त विषयान्वये कळविणेत येते की, संदर्भ क्र. । चे शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाज्येष्ठता शून्य होते म्हणून कर्मचारोंच्या त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ extra increment वेतनवाढ देण्याची तरतूद आहे. संदर्भ क्र.2 अन्वये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अदयापपर्यंत सुरु आहे. या निर्णयानंतर दुसरा कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही, असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.
Extra increment संदर्भीय शासन निर्णय व पत्र सोबत संलग्न केलेलो आहेत. सदरची बाब सातारा जिल्हयात आंतर्राजल्हा बदलीने आलेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत पुढील आवश्यक तो कार्यवाही करावी.