राज्यात खरीप हंगाम २०२४ मधील शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीला ७ दिवसांची मुदतवाढ देणे बाबत epick pahani 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यात खरीप हंगाम २०२४ मधील शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीला ७ दिवसांची मुदतवाढ देणे बाबत epick pahani 

संदर्भ- १. महाराष्ट्र शासन महसूलव वनविभाग शासन निर्णय क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.७४/ज-१अ, दि.३१/०१/२०२३ २. राज्यस्तरीय सनियंत्रण समिती बैठक निर्णय दिनांक ११.९.२०२४

राज्यात खरीप हंगाम सन २०२४-२५ हा दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू करण्यात आला आहे व दि.१५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करीता उपलब्ध आहे. परंतू राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार, प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. तदनुसार खरीप हंगाम २०२४ करीता ०७ दिवसाची दि. २३.०९.२०२४ पावेतो शेतकरी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सहायक/तलाठी स्तरावरील पिक पाहणी मुदत ०७ दिवसाची (दि. २४.०९.२०२४ ते दि. २३.१०.२०२४) मुदतवाढ देण्यात येत आहे.

तसेच याबाबत योग्य प्रचार, प्रसिद्धी करून शेतकऱ्यामार्फत जास्तीत जास्त पीकपेरा नोंदी करणेबाबत योग्य ते निर्देश आपले स्तरावरून देण्यात यावेत, व दिलेल्या मुदतवाढीचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पिक पेरा नोंदवता येईल या बाबत जनजागृती साठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.