राज्यात प्राध्यापक भरतीसाठी होणार सामायिक प्रवेश परीक्षा गुणवत्ताधारक प्राध्यापकांच्या निवडीसाठी आग्रही entrance exam for pradhyapak bharti
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्राध्यापकाची निवड गुणवत्ता
आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे. यासाठी सर्वांना समान संधी मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल. त्यातून मेरीटद्वारे निवडलेले गुणवत्ताधारक प्राध्यापक पुढील ३० वर्षांसाठी शिक्षण व्यवस्थेची काळजी घेतील, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती
सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी विद्यापीठाच्या फोर्ट
परिसरातील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात पार पडला.
सध्या अनेक विद्यापीठांकडे आवश्यक तेवढे प्राध्यापक नाहीत. मात्र, महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आग्रही आहोत. एमपीएससीद्वारे प्राध्यापकांची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्यात काही अडचणी आहेत. त्यावर काम सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
विद्यापीठाला वर्षभरात ७ पेटंट
मुंबई विद्यापीठाकडून संशोधनावर भर दिला जात आहे. त्यातून वर्षभरात विद्यापीठाला सात पेटंट मिळाली असून, त्यातील ४ पेटंट प्रसिद्ध झाली आहे. ही पेटंट एंन्व्हारमेंट मॉनिटीरिंग सिस्टिम, स्मार्ट सेन्सर ईक्चिप्ड लॅम्प, अँटी स्नेक व्हेनम आदी विविध प्रकारांत ही पेटंट मिळाली आहेत, अशी माहिती कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.