विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
👉या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.