शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबतEmployees Master Database (EMD)
शासन परिपत्रक :
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै, २०२४ या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे. यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, २०२४ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित न करणेबाबत संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा
जुनी पेन्शन बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय
अपार दिवस साजरा करण्याबाबत शासन निर्णय
NAS परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्रश्नपेढी उपलब्ध
52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारणासाठी मुदतवाढ
ब्लेंडेड मोड कोर्स साठी मदतवाढ परिपत्रक
२. तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) साठीचे संकेतस्थळ कार्यान्वीत नाही. त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी संर्वकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही, अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर २०२४ ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय/प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत. उपरोक्त नमूद संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील.
३. अधिदान व लेखा अधिकारी तसेच कोषागारे / उप कोषागारे अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात.
शासन परिपत्रक क्रमांका असांस-१३२४/प्र.क्र. ९३/का.१४१७
४. सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३४३ / २०२४ / कोषा प्रशा ५. दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४११२६१२४८१६७८१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,