एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा सुधारीत वेळापत्रक (चित्रकला परीक्षा) या तारखेला होणार परीक्षा elementary exam timetable 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा सुधारीत वेळापत्रक (चित्रकला परीक्षा) या तारखेला होणार परीक्षा elementary exam timetable 

महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने/स्थानिक प्रशासनाने ज्या ज्या जिल्ह्यातील शाळांना दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्या त्या जिल्ह्यातील दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ रोजी होणाऱ्या एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे दोन्ही पेपर रद्द करुन उर्वरीत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर वेळापत्रकानुसार परीक्षा आयोजन करण्यात आले आहे. तसेच शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल झाला नसल्यामुळे सदर परीक्षा नियमीत वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात याव्यात.

हे ही वाचा

👉PAT संकलित परीक्षा-1 सुधारित शुद्धिपत्रक येथे पहा

👉जिल्हा अंतर्गत बदली बाबत vinsys चे पत्र

👉दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वितरण

👉सन 2016 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगात्वाचे 21 प्रकार

👉शिक्षण शल्क व परीक्षा शुल्क यासाठी उत्पन्नाची आठ रद्द शासन निर्णय येथे पहा

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे दोन पेपर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर केली असल्याने घेता आलेले नाही. अशा संबंधित (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व पुणे) जिल्ह्यामध्ये सदर परीक्षा रविवार दिनांक २९.०९.२०२४ रोजी घेण्यात यावी. या प्रकारच्या सूचना सर्व संबंधित विद्यार्थी/पालक/सहभागी शाळांना आपल्या स्तरावरुन देण्यात यावे. सुधारीत वेळापत्रकाचा तपशील खालील प्रमाणे,

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा सुधारीत वेळापत्रक

वरील सुधारीत वेळापत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा आयोजन करताना दिनांक २६.०९.२०२४ रोजी संकल्पचित्र-नक्षीकाम (Design) व कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry & Lettering) च्या प्रश्नपत्रिकांचा वापर दिनांक २९.०९.२०२४ रोजी होणाऱ्या परीक्षांकरिता केला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका रद्द समजण्यात येतील व याबाबतीत सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील याची नोंद घेण्यात यावी.

सदर परिपत्रक www.msbae.org.in/https://dge.msbae.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.