जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा विज बिल ग्रामपंचायतने भरणेबाबत electricity bill of school
संदर्भ :-1) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 45 अन्वये ग्रामसुची मधील शिक्षक विषयक बाबीवर खर्चाची तरतूद
2) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, यवतमाळ यांचे दि. 25/11/2019 चे निवेदन
3) शिक्षण व आरोग्य सभापती जि.प. यवतमाळ यांचे दि. 25/11/2019 चे पत्र
उपरोक्त संदर्भान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 45 अन्वये ग्रामसुची मधील शिक्षण विषयक बाबीवर खर्च करण्याची तरतूद आहे. जिल्हयातील शाळांचा दर्जा उंचावणे व जि.प. शाळेतील डीजीटल, संगणकीय उपकरण्याचा नियमीत विनीयोग होणे आवश्यक आहे तसेच विजेअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व शैक्षणिक उपक्रमावर विपरीत परिणाम होऊ नये या करीता विज देयक नियमीत भरणा होणे आवश्यक आहे. परंतू जि. प. शाळांना अपुरे अनुदान प्राप्त होत असल्याने वेळोवेळी विज देयकाचा
भरणा करतांना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उपरोक्त बाबीचा विचार करता याद्वारे आपणास निर्देड करण्यात येते की, जिल्हा परीषद प्राथमिक शाळांचा विज देयकावरील खर्च हा ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून करण्याकरिता आपल्या अधिनस्त
ग्रामपंचायतींना निर्देशित करुन वेळोवेळी आढावा घ्यावा.
करिता माहितीस व यथाशिघ्र कार्यवाहीस अग्रेषित.