मतदान प्रतिनिधी नेमणूक कशी करावी? election voting pratinidhi
मतदान प्रतिनिधी सामान्यतः त्याच मतदान केंद्रातील किंवा लगतच्या मतदान केंद्रातील रहिवासी व मतदार असावा. याप्रमाणे मतदान प्रतिनिधी नेमण्यात अडचणी येत असतील तरच त्याच विधानसभा मतदारसंघाचा असलेल्या व्यक्तीमधून मतदाराची मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करू शकतो. कोणत्याही
मतदान प्रतिनिधीने EPIC अथवा इतर पर्यायी फोटो असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच/सदस्य, नगरपालिकाचे सदस्य ईत्यादींची मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
प्रत्येक उमेदवाराला एक मतदान प्रतिनिधी व एक बदली मतदान प्रतिनिधी नेमता येतील, मात्र एकावेळी मतदान केंद्रात एकच प्रतिनिधी थांबेल.
मतदान प्रतिनिधींना मतदानाच्या गुप्ततेबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ चे ‘कलम १२८’ मधील तरतुदी वाचून दाखवा.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ चे ‘कलम १२८’
मतदान गुप्त राखणे. १२८० (१) जो निवडणुकीच्यावेची मतनोंदणीच्या किया मतभोजणीच्यासंबंधात काही काम
करतो असा प्रत्येक ड अधिकारी, लिपिक किया कन्य इलाम पाला मतदान गुप्त राखावे लागेल, तसेच ते
राखण्यास मदत करावी लागेल आणि (कोणत्याही कायद्यानुसार किंवा त्या खाली साही प्रयोजनासाठी
बधिष्ठांत केले असेल त्याव्यतिरिक्त एरव्ही), व्यामुळे अशी गुप्तता भंग पावेस असे मानण्याजोगी कोणतीही
माहिती, कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही.
(२) जी व्यक्ती, पोटकलम (१) मधील उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती, तीन महिन्यां-
पर्वत असू शकेल इतस्था मुदतीच्या कारावासास, किवा द्रव्यदंडास, किया दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
प्रत्येक प्रतिनिधीस विहीत नमुन्यातील प्रवेशपत्र (Entry Pass) द्या व त्याचा हिशोब ठेवा.
मतदान प्रतिनिधींची ये-जा बाबतच्या नोंदी ‘जोडपत्र-११’ मध्ये ठेवाव्यात.
नेमणूक पत्रातील प्रतिज्ञापत्रावर तुमच्या समोर त्याची सही घ्या.
त्यांचे नियुक्ती पत्र व त्यावरील उमेदवारांची किंवा इलेक्शन एजन्ट ची स्वाक्षरी RO नी दिलेल्या स्वाक्षरीशी तपासून घ्या.
मतदार यादीबाबत मतदान प्रतिनिधींना द्यावयाची माहिती
मतदार यादीची कार्य प्रत
वर्गीकृत सेवा मतदारांनी (Classified Service Voter) नेमलेल्या बदली व्यक्तींची (Proxies) यादी (जर असल्यास)
मतदार नोंदवही ‘नमुना 17A’ ही नोंदवही कोरी आहे व त्यात कोणतीही नोंद नाही, हे दाखवावे.
पहिल्या मतदाराने ‘नमुना 17A’ मध्ये सही करण्यापुर्वी मतदान अधिकारी-१ याने ‘नमुना 17A’ मध्ये ‘CU मधील मतांची संख्या तपासली, ती शून्य आहे’, असा शेरा मतदान केंद्राध्यक्षाच्या संमतीने नोंदवावा.
मतदान प्रतिनिधी म्हणून निवड करता येणार नाही/अनर्हता
• केंद्रशासनाचे किंवा राज्य शासनाचे मंत्री, लोकसभा/विधानसभा/विधान परिषदांचे सदस्य
• न.पं. किंवा जिल्हा परिषद यांचे अध्यक्ष
• केंद्रीय PSU, राज्य PSU, केंद्रीय बॉडी / कार्पोरेशनचे अध्यक्ष
• शासनाचे किंवा शासन अनुदानीत संस्थेकडून मानधन मिळत असणारे व्यक्ती.
• रास्त भाव दुकानदार, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी जे शासनाच्या किंवा शासन अनूदानित संस्थेच्या सेवेत आहेत.
• शासनाच्या सेवेत असणारे अधिकारी/कर्मचारी.
• ज्यांना सुरक्षा प्रदान केली आहे, असे व्यक्ती
मतदान प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रावर सोबत आणावयाच्या बाबी
> Form 10 मधील मूळ नियुक्ती पत्र
> मतदान केंद्राची मतदार यादी.
> पेन, पेपर, पेन्सील
> मतदान केंद्रावरील EVM चा तपशील जो RO नी दिला आहे.
> Mobile चा वापर करू शकत नाही.
39
मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था/ क्रम
मतदारांना ओळखू शकतील, मतदान केंद्राध्यक्ष किंवा Control Unit हाताळणारा तिसरा मतदान अधिकारी यांचे कामकाज आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया पाहू शकतील अशी सुयोग्य जागा
मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार.
ज्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारसंघामध्ये त्यांच्या राखीव चिन्हांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे असे उमेदवार,
नोंदणीकृत परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांचे उमेदवार आणि
अपक्ष उमेदवार.
मतदान प्रतिनिधीचा Entry Pass नमुना