निवडणुकीतील शिक्षकांची पोस्टल मतदानासाठी कसरत: सर्वच मतदारसंघांत नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पुर्ण election voting postal ballot 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवडणुकीतील शिक्षकांची पोस्टल मतदानासाठी कसरत: सर्वच मतदारसंघांत नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पुर्ण election voting postal ballot 

लोकमत न्यूज नेटवर्क किर्लोस्करवाडी : निवडणूक कामकाज यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मतदान अधिकारी तथा शिक्षक कर्मचारी हेच पोस्टल मतदानापासून वंचित राहतात की काय? असा प्रश्न अनेक मतदारसंघांत निर्माण झाला आहे. दीपावली सुटीनंतर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण झाले. त्यावेळी अनेकांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध झाल्या नसल्याचे समजले.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षकांना निवडणूक कर्तव्याचे आदेश आले होते. पैकी पाहिले प्रशिक्षण २६- २७ ऑक्टोबर तर दुसरे प्रशिक्षण १२-१३ नोव्हेंबर रोजी झाले, पहिल्या प्रशिक्षणावेळी सर्वच कर्मचारी यांच्याकडून पोस्टल मतदानासाठी फॉर्म नंबर १२ भरून घेण्यात आले होते. पैकी काही लोकांना दुसऱ्या प्रशिक्षणवेळी या मतपत्रिका मिळाल्या व त्यांनी मतदानदेखील केले. परंतु बहुतांश लोकांना त्यांच्या मतपत्रिका इकडे आल्याचं नाहीत, असे सांगण्यात आले. आता तुम्ही १९ रोजी मतदान साहित्य नेताना हे मतदान करून मग निघा असे सांगण्यात आले. मुळात त्यादिवशी साहित्य मोजून घेऊन केंद्रावर जाण्याची घाई असते. त्यात अधिकारी लोक ज्या मतदारसंघाचे मतदार किंवा कार्यरत आहेत, असे मतदारसंघ वगळून इतरत्र त्यांना ड्यूटी आहे. मग, आदल्या दिवशी नियुक्त मतदान केंद्रावर वेळेत जायचे की, रांगेत उभे राहून मतदान करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जवळपास दहा टक्के लोकांना पहिले प्रशिक्षण झाल्यानंतर दुसरे प्रशिक्षण लागले नाही. म्हणजे मतदान दिवशी ते मूळ गावी असणार. अन् तिथे मतदानासाठी गेले तर त्यांना मतदान करता येणार नाही, कारण त्यांच्या नावासमोर पोस्टल बॅलेट असा शिक्का असणार आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेमुळे शिक्षकांना नाहक त्रास होत असलेले अनेकांनी नाराजी व्यक्त केली.