शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वाटप संदर्भात सूचना परिपत्रक educational videos making competition 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वाटप संदर्भात सूचना परिपत्रक educational videos making competition 

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर निकाल घोषित करणेबाबत

संदर्भ १. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ४१/एसडी४ दि.११/०५/२०२३.

. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी./शिव्हिनिस्प२३/२०२३/०३३३३ दि.२०/०७/२०२३.

३. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी/शिव्हिनिस्प२३/२०२३/०४२८३ दि.११/०९/२०२३.

४. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी/शिव्हिनिस्प२३/२०२३/०४८६७ दि.२४/११/२०२३.

५. मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र जा.क्र. संकी. २०२३/प्र.क्र.४१/एसडी ४ दिनांक २४ सप्टेंबर २०२४.

६. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैसंप्रप/आय.टी./शिव्हिनिस्प२३/ब.वि.समा./०४५८० दिनांक २६/०९/२०२४

७. प्रस्तुत परिषदेची मंजूर टिपणी दिनांक ३०/०९/२०२४

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती बक्षीस वाटप सूचना संदर्भात परिपत्रक Click here 

उपरोक्त संदर्भ क्र. १ ते ४ नुसार दिनांक १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत तालुका,

जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये

प्रत्येक स्तरासाठी (प्रत्येक तालुका/जिल्हा व राज्य) ८४ बक्षिसे (प्रथम, द्वितीय, तृतीय) निर्धारित होती. सदर सर्व

स्तराचे मूल्यमापन कामकाज पूर्ण करण्यात आले. संदर्भ क्र. ५ व ६ नुसार शासन मान्यतेने दिनांक २९/०९/२०२४

रोजी राज्यस्तरावरील निकाल जाहीर करण्यात आला असून संदर्भ क्र. ५ नुसार या पत्राद्वारे जिल्हा व तालुकास्तरील निकाल घोषित करण्यात येत आहेत.

निकाल पाहण्यासाठी उपरोक्त लिंकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेचा उपयोग करून ज्या तालुक्याचा किंवा तालुक्यातील काही विषयांचा निकाल पोर्टलवर उपलब्ध नाही असे दिसून आल्यास संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी केलेले तालुकास्तर मूल्यमापन पत्रक (निवड समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या असलेले) जिल्हा निवड समिती अध्यक्ष यांना सदर करून, संबंधित गटातील, संबंधित विषयांचे प्रथम तीन क्रमांक जिल्हा निवड समितीच्या अध्यक्षांची (संबंधित जिल्ह्याचे डायट प्राचार्य) मान्यता घेऊन तालुका

स्तरावरच घोषित करावेत.

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click Here

संपूर्ण निकाल घोषित झाल्यानंतर,

१) गटशिक्षणाधिकारींनी तालुका स्तर निवड झालेल्या शिक्षकांची यादी खालील प्रारुपात इंग्रजीमध्ये तयार करावी. त्याची एक प्रिंट कॉपी प्रमाणित व एक ओपन एक्सेल फाईल आपल्या संबंधित प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस जमा करावी. या सर्व माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारींनी यांची असेल.

हे ही वाचा

👉शिक्षकांच्या जिल्हा अतर्गत बदली बाबत

👉NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे बाबत

👉सरळसेवेने मानधन तत्वावर पदे भरणे बाबत

👉चित्रकला स्पर्धा एक लाखाचे पारितोषिक

👉मुलींच्या शिष्यवृत्तीत तिपटीने वाढ

👉परिवहन समिती शासन निर्णय

👉अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ

👉शाळा आता पाच तासच भरणार

२) संबंधित प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी तालुका स्तरावरून प्राप्तं सर्व याद्या एकत्र कराव्यात. त्यानंतर सर्व तालुक्यांचे मिळून एकूण प्रथम क्रमांक गुणिले (x) तीन हजार (रु.३०००/-), एकूण द्वित्तीय क्रमांक गुणिले (x) दोन हजार (रु.२०००/-) आणि एकूण तृतीय क्रमांक गुणिले (x) दीड हजार (रु.१५००/-) याप्रमाणे

प्रत्येक क्रमांकाच्या एकूणची (तिन्ही क्रमांकांची) बेरीज करून तालुका बक्षीस वितरणाची रक्कम अंतिम करावी. मात्र काही ठिकाणी प्रथम, द्वितीय किंवा तृतीय ठिकाणी एकापेक्षा अधिक विजेते असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी अशी बेरीज करता येणार नाही. अशा प्रसंगी एक बाब लक्षात घ्यावी ती म्हणजे कोणत्याही गटाच्या कोणत्याही क्रमांकावर कितीही विजेते घोषित झालेले असले तरी प्रथम तीन क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम कोणत्याही परिस्थितीत प्रथम रु. ३०००/- अधिक द्वितीय रु. २०००/- अधिक तृतीय क्रमांक रु. १५००/- यांची एकूण रु. ६,५००/- पेक्षा अधिक होणार नाही याची नोंद घ्यावी. अशा प्रसंगी हिशोब निश्चित करताना खालील नियम/प्रसंग लक्षात घ्यावेत,

1) समजा एखाद्या विषयात प्रथम क्रमांकावर दोन विजेते असल्यास ते एक मानून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या बक्षीस रकमेची बेरीज करावी. (रु. ५०००/-) ती दोघांना विभागून दिली जाईल. अशा वेळी तृतीय क्रमांकावर कितीही विजेते असले तरी त्यांना केवळ तृतीय क्रमांकाची रक्कम (रु. १५००/-) विभागून देण्यात येईल.

॥) समजा, प्रथम क्रमांकावर तीन विजेते असल्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षीस रकमेची बेरीज करावी. ती तिघांमध्ये विभागून देण्यात येईल. अशा प्रसंगी द्वितीय किंवा तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वतंत्ररीत्या हिशोबात येत नाही.

II) समजा, द्वितीय क्रमांकावर दोन विजेते असल्यास ते एक मानून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षीस रकमेची बेरीज करावी. ती दोघांना विभागून दिली जाईल. अशा वेळी तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वतंत्ररीत्या हिशोबात येत नाही.

IV) समजा, प्रथम व द्वितीय क्रमांकावर प्रत्येकी एक-एक विजेता असेल व तृतीय क्रमांकावर मात्र तीन विजेते असतील, अशा प्रसंगी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी नियमितनुसार अनुक्रमे रु. ३०००/- व रु. २०००/- बक्षीस लागू होईल व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मात्र त्या क्रमांकावर असलेल्या तीन व्यक्तींत (रु. १५००/-) विभागून देण्यात येईल.

३) संबंधित प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हास्तर निकालाच्या बाबतीत तालुकास्तरासाठी याच पत्रातील उपरोक्त मुद्दा क्रमांक १ मध्ये दिलेल्या प्रपत्रानुसार जिल्हा विजेत्यांची यादी करावी. तसेच, ज्या प्रमाणे तालुकास्तर बक्षिसासाठी संपूर्ण तालुक्याची एकूण रक्कम निश्चित केली त्याच नियमांचा उपयोग करून (यामध्ये अंतिम हिशोब करताना नियम जरी तालुकास्तराप्रमाणे असले तरी बक्षिसाच्या रकमेत मात्र बदल होईलू उदा. प्रथम क्रमांक १०,०००/- द्वितीय क्रमांक ९०००/- व तृतीय क्रमांक ८,०००/-) जिल्हास्तर बक्षिसासाठी लागणारी एकूण रक्कम निश्चित करावी.

४) संबंधित प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी तालुकास्तर बक्षीस एकूण रक्कम व जिल्हास्तर बक्षिसाची एकूण रक्कम सर्व ताळमेळ पडताळून दोन्हींची एकत्रित मागणी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे दिनांक ११/१०/२०२४ पर्यंत सादर करावी. त्यानंतर संबंधित जिल्ह्यांना बक्षिस रक्कम व आवश्यक इतर निधीचे वितरण करण्यात येईल.

निधी वितरण पत्रासोबत या स्पर्धेतील जिल्हा व तालुका स्तरावारतील बक्षीस वितरण नियोजन लवकरच एक सविस्तर पत्र निर्गमित करून कळविण्यात येईल, तरी जिल्हा व तालुकास्तरावरील निकाल संबंधितांना सूचित करून पुढील आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.

Join Now