शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वितरणास उपस्थित राहणे बाबत educational videos compitition 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वितरणास उपस्थित राहणे बाबत educational videos compitition 

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहाण्यासाठी संबंधितांस कार्यमुक्त / सूचित करणेबाबत….

संदर्भ –

१. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ४१/एसडी४ दि.११/०५/२०२३.

२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी/शिव्हिनिस्पर३/२०२३/०३३३३

दि.२०/०७/२०२३.

३. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवाप्रयम/आय.टी/शिव्हिनिस्प२३/२०२३/०४२८३ .

दि.११/०९/२०२३

हे ही वाचा👇

👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार

👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक

👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत

👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr 

 

 

👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय

👉 जिल्हा अंतर्गत बदली बाबत vinsys चे पत्र

. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी/शिव्हिनिस्प२३/२०२३/०४८६७ ४

दि.२४/११/२०२३.

५. मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र जा.क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.४१/एसडी ४ दिनांक २४ सप्टेंबर २०२४.

उपरोक्त संदर्भ क्र. १ ते ४ नुसार दिनांक १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक स्तरासाठी ८४ बक्षिसे (प्रथम, द्वितीय, तृतीय) निर्धारित होती. सदर सर्व स्तराचे मूल्यमापन कामकाज पूर्ण करण्यात आले असून संदर्भ क्र. ५ नुसार शासन मान्यतेने राज्यस्तरावरील निकाल जाहीर करण्यात येत आहे. (यादी संलग्न) त्यानुसार एकूण ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी एकूण ८४ बक्षिसांचे (प्रथम, द्वितीय, तृतीय) वितरण करण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठीक १०.०० वा. महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभास आयोजित करण्यात आला आहे. तरी या पत्रासोबत संलग्ननुसार सदर समारंभासाठी उपस्थित राहणेबाबत आपल्या अधिनस्त शिक्षकांना बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणेबाबत तसेच खालील सूचनांचे पालन करणेबाबत अवगत करावे,

१) दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रस्तुत परिषदेमध्ये भारत सरकार व महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने आयोजित व पूर्वनियोजित उल्हास मेळावा असल्याने, संभाव्य गर्दी पाहता पुरस्कार घेण्यासाठी यादीतील शिक्षकांनी केवळ स्वतः उपस्थित राहावेः इतर कोणत्याही व्यक्तीस सोबत घेवून येवू नये किंवा पुरस्कार घेण्यासाठी कोणताही प्रतिनिधी पाठवू नये.

२) पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी वेळेवर (सकाळी ८.३० वाजेपर्यंत) उपस्थित राहून नोंदणी करावी. (नोंदणी

परिषदेच्या पत्रद्वारा प्रशिक्षण हॉल, पार्किंग इमारतीच्या आवारात, जुन्या होस्टेलच्या मागे; असेल.) ३) पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी, समारंभास येताना शिक्षकास शोनेल अशा पेहरावात उपस्थित राहावे.

तरी, संलग्न यादीनुसार बक्षीसपात्र ८४ शिक्षकांना पुरस्कार वितरण समारंभासाठी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी सूचित / कार्यमुक्त करावे. तसेच, या स्पर्धेतील जिल्हा व तालुका स्तराचा निकालही लवकरच घोषित करण्यात येईल.

याबाबतच्या सर्व सूचना एक सविस्तर पत्र निर्गमित करून लवकरच देण्यात येतील.

तसेच पत्रासोबत संलग्न, या स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांना निमंत्रण पत्रिकेचा नमुना देण्यात येत आहे. त्यावर त्यांचे नाव लिहून ती पत्रिका संबंधित शिक्षकांना आपल्या यंत्रणेमार्फत पोहोच करावी.