शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन शासन निर्णय educational trip Gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन शासन निर्णय educational trip Gr 

संदर्भ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा क्र. टीडीएस-२०१५/११/प्र.क्र.१०२१-पर्यटन, दिनांक ०४ मे, २०१६ चा शासन निर्णय.

प्रस्तावना :

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्याचे पर्यटन धोरण निश्चित करण्यात आले असून राज्यातील पर्यटन धोरणाला चालना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे अशी पर्यटन विभागातर्फे विनंती करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने शैक्षणिक सहलींच्या आयोजनाबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

राज्यातील सर्व माध्यमाच्या तसेच सर्व मंडळाशी संलग्नित शाळांतील इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एका शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे (Educational Tour/Rural Tourism) आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. तथापि, अशा सहलीच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये.

सहलीमध्ये सहभागी होण्याकरीता संबंधित पालक व विद्यार्थ्यांची संमती असणे आवश्यक राहील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७०५२०१५००५८१३२१ असा आहे.

हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने