शिक्षण संचालनालय (योजना) संचालनालयातील अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटीच्या नियोजनाबाबत education sanchalnalay yojna visit arrangement
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे या संचालनालयातील अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटीच्या नियोजनाबाबत.
संदर्भ:- १) शा.नि. कः नभासाका-०३२२/प्र.क्र.३९/एस. डी. २ केंद्र पुरस्कृत “नव भारत साक्षरता कार्यक्रम” (NBSK) योजनेची अंमलबजावणी करणेबाबत, दि. १४/१०/२०२२ २) शा. नि. कः नभासा-०३२२/प्र.क्र.३९/एस. डी. २ नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२७ या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत, दि. २५/०१/२०२३ राज्यस्तरीय /जिल्हास्तरीय / गटस्तरीय / शाळास्तरीय समित्यांची स्थापना करणेबाबत. ३) मा. शिक्षण संचालक, शिसंयो, यांचे अध्यक्षतेखालील साप्ताहिक आढावा बैठक दि.
१९/११/२०२४.
उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षण संचालनालय (योजना) मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीबाबत नियमित ऑनलाईन बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे तसेच केंद्र पुरस्कृत उल्लास नव-भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर केलेली पूर्वतयारी तसेच उल्लास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालयातील अधिकारी खालील वेळापत्रकाप्रमाणे शैक्षणिक विभागांना व त्या अंतर्गत जिल्हा, तालुका कार्यालयांना आणि निवडक शाळांना भेटी देणार आहेत.
👉👉👉शासन परिपत्रक येथे पहा Click here