प्रशासकीय विभागांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याबाबत e-office services shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रशासकीय विभागांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याबाबत e-office services shasan nirnay 

प्रस्तावना –

राज्य शासनाच्या शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने व जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मंत्रालयीन विभागांमधील शासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करून सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती राबविण्याबाबत संदर्भाधीन अनु. १ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांत तसेच क्षेत्रीय कार्यालयांमधील शासकीय कामकाजात दिनांक ०१ एप्रिल, २०२३ पासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी संदर्भाधीन अनुक्रमांक २ ते ५ येथील परिपत्रकांन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक-

आता मंत्रालयातील सर्व विभागांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर अधिकाधिक व्हावा याकरिता तसेच मंत्रालयातील सर्व विभागांमधील भौतिक नस्त्यांचे (Physical Files) प्रमाण कमी करण्याकरिता सर्व विभागांना खालील सूचना देण्यात येत आहेत-

(१) विभागांतर्गतच्या नस्त्या या ई-फाईल स्वरूपातच असणे आवश्यक आहे आणि भौतिक स्वरूपातील नस्त्या (Physical Files) पाठविणे बंद करावे.

(२) आंतर-विभागीय नस्त्यादेखील ई-फाईल स्वरूपात असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही

भौतिक स्वरूपातील नस्त्या पाठवल्या किंवा स्वीकारल्या जाऊ नयेत.

(३) काही विभाग त्यांच्या भौतिक स्वरूपातील नस्त्या स्कॅन करतात आणि ई-ऑफिसद्वारे पाठवत्तात. आता त्यालाही परवानगी नाही. ई-फाईल केवळ ग्रीन नोट वापरून आणि विभागाच्या सहसचिव/सचिव / अपर मुख्य सचिव यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी वापरूनच तयार केल्या पाहिजेत.

शासन परिपत्रक क्रमांका संकीर्ण २०२३/प्र.क्र. ०२/कार्या.र.व का १

(४) सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, नियोजन विभाग विधि व न्याय विभाग आणि मा. मुख्यमंत्री कार्यालयास सादर करावयाच्या नस्त्या या ई- ऑफिसमधूनच सादर कराव्यात. या विभागांद्वारे कोणत्याही भौतिक फाइल्स पाठवू किंवा स्वीकारू नयेत.

(५) मा. मंत्री/मा. उपमुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करायच्या फाईल्सदेखील ई-ऑफिसमार्फत सादर करणे आवश्यक आहे.

ही कार्यालये मा. मंत्री/ मा. उपमुख्यमंत्री/मा. मुख्यमंत्री यांची डिजिटल स्वाक्षरी घेऊ शकतात. त्यांना असे करण्यात काही अडचण आल्यास, ते ई-फाइल ग्रीन नोटची प्रिंट घेऊ शकतात, मा. मंत्री मा. उपमुख्यमंत्री / मा. मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष स्वाक्षरी घेऊ शकतात आणि पुढे पाठवण्यापूर्वी ई-फाईलचा भाग म्हणून ग्रीन नोटमध्ये पुन्हा अपलोड करू शकतात.

(६) सदर ई-ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागाचे पूर्ण सहकार्य असेल.

सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अमलात येतील.

२.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०७१२१५२१२२५७०७ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now