सन 2024-25 या वर्षातील दिवाळी सुटयाबाबत वेळापत्रक divali holidays timetable
संदर्भ :- 1) माध्यमिक शाळा संहिता 52.1,53.2.53.3 व इ 52.2 नुसार
2) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.105/एसडी-4/दि. 20/04/2023
3) शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत. पुणे यांचे पत्र क्र. शिसमा/24/(ए-01) उन्हाळी सुटटी/ए-1/2206/दि. 18/04/2024
उपरोक्त संदर्भ क्र.3 अन्वये राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेंना दयावयाच्या दिवाळी सुटटयाबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार जालना जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुटटया खालीलप्रमाणे राहतील.
1. दिवाळी सुटटी :- दि.28/10/2024 ते दि. 14/11/2024 पर्यंत राहतील दि. 15/11/2024 रोजी गुरुनानक जयंती निमित्त सुटटी असल्याने दि. 16/11/2024 पासून शाळा सुरु होतील.
2. शासन निर्धारीत सुटटया: 20 दिवस
3. मा. जिल्हाधिकारी निर्धारित सुटटया 3 दिवस
4. मुख्याध्यापक स्तरावरील सुटटया 2 दिवस
ज्या शाळांना नाताळ किंवा रमजान मोहरम सारख्या सणांना सुटटया घ्यावयाच्या असतील त्यांनी दिवाळीची सुटटी कमी करून त्याऐवजी नाताळ किंवा रमजान मोहरम सारख्या सणांचे प्रसंगी तेवढयाच कालावधीची सुटटी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी. तसेच स्थानिक सण, यात्रा प्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा.
शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दीर्घ सुटटया अनुज्ञेय नाही. मात्र दीर्घ सुटटयांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुटटया असतील त्या सुटटया शिक्षकेत्तर सुटटया अनुज्ञेय असतील.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक चे एकूण प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान कार्यदिन 222 व माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे कार्यदिन माध्यमिक शाळा संहितेनुसार किमान 230 राहतील याची नोंद घ्यावी.