सन 2024-25 चालू वर्षात अंतर्गत दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम चे अनुदान वाटप करणे बाबत divali festival san agrim 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 चालू वर्षात अंतर्गत दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम चे अनुदान वाटप करणे बाबत divali festival san agrim 

विषय :- सन 2024-25 चालू वर्षात लेखाशीर्ष 20530565 (36) अंतर्गत दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम चे अनुदान वाटप करणे बाबत.

उपरोक्त विषयान्वये सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत लेखाशीर्ष 20530565 (36) खालील जि.प स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील वर्ग-३ चे कर्मचारी व वर्ग-4 (कार्यालयीन आस्थापना) तसेच पंचायत समिती स्तरावरील ग्राम सेवक ग्राम विस्तार अधिकारी (ग्राम पंचायत अस्थापना) यांचे करीता दरवर्षी दिवाळी ह्या सणानिमित्त अग्रीमाचे वाटप प्रत्येकी कर्मचारी निहाय (ऐच्छिक नुसार) मंजूर अनुदान रक्कम रु.12500/- प्रमाणे (अक्षरी रक्कम रु. बारा हजार पाचशे मात्र) वाटप करण्यात येते.

त्याप्रमाणे गेल्या वर्षी सन 2023-24 ह्या आर्थिक वर्षात लेखाशीर्ष 20530565 (36) खाली आपल्या कार्यालयातील ऐच्छिक असलेले कर्मचारी (वर्ग-3 व वर्ग-4) तसेच ह्या लेखाशिर्षांतर्गत येत असलेले वेतन धारक ग्राम सेयक/ग्राम विरतार अधिकारी यांना देखील दिनांक 08/11/2023 करण्यात आलेले होते. तरी असे निदर्शनास आले आहे की आपल्या कार्यालयातील काही ऐच्छिक असलेले वर्ग 3 व वर्ग-4 चे कर्मचारी तसेच ग्राम पंचायतीतील ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी यांचे दिवाळी सणानिमित्त करण्यात आलेली अनुदान मागणी पत्र हे वेळीच ह्या विभागास सादर झाले नाही परिणामी ते उशिराने प्राप्त झाल्या कारणाने व अनुदान अभावी अशा वर्ग-3, वर्ग-4 कर्मचारी तसेच

ग्राम सेवक/ग्राम विस्तार अधिकारी यांस दिवाळी सणाग्रीमाचे अनुदान ऐनवेळी वितरीत करता आले नाही.

आता बालू वर्ष सन 2024-25 ह्या आर्थिक वर्षात देखील ह्या विभागांतर्गत लेखाशीर्ष 20530565(36) खालील जि.प स्तरावरील संबंधित कर्मचारी जे इच्छुक आहेत असे कर्मचारी (वर्ग-3 व वर्ग 4) तसेच पं. स स्तरावरील ग्राम सेवक ग्राम विस्तार अधिकारी जे इच्छुक आहेत असे कर्मचारी च्या प्रत्येकी संख्ये निहायच गुणिले सण अग्रीम मंजूर अनुदान रक्कम 12500/- प्रमाणे एकूण आवश्यक तेवढीच लागणारी रक्कम ही आपल्या कार्यालयीन कर्मचारी यांच्या कार्यालयीन आस्थापना व ग्राम पंचायत आस्थापना तक्ता निहाय नोंद करून सण अग्रीम अनुदान मागणी पत्र हे आपल्या कार्यालय प्रमुख यांच्या प्रतीस्वाक्षरीने सत्य छायांकित प्रत व सोबत मागील वर्ष-2023-24 ह्या आर्थिक वर्षात आपल्या कार्यालयाकडून सण अग्रीम अनुदान रक्कम पूर्ण वसूल केल्या बायतचा दाखला/प्रमाणपत्र अशी दोन्ही माहिती ह्या विभागातील बजेट कार्यासनाला दिनांक: 11/10/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तात्काळ सादर करण्यात यावी.

अन्यथा आपल्या कार्यालयातील कार्मचारींचे मागीलप्रमाणेच इच्छुक असलेले कर्मचारीसाठी संख्येनिहाय आवश्यक असलेली दिवाळी सणाग्रीमाचे अनुदान मागणी पत्र हे ह्या विभागास वेळेवर प्राप्त होण्यास विलंब झाल्यास मागणी पत्र उशिराने सादर केल्यास याबाबतची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील व आपल्या कार्यालय स्तरावर सन 2024-25 ह्या चालू वर्षात दिवाळी सण अग्रीन अनुदानाचे वाटप करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सोबत :- विवरण पत्र नमुना तक्ता पुढीलप्रमाणे होय.

जिल्हा परिषद चे परिपत्रक येथे पहा Click here