दिवाळी सणापुर्वी सर्व कर्मचा-यांचे वेतन ३१ ऑक्टोबरपूर्वी वितरीत करणेबाबत divali festival payment
३१ ऑक्टोबरला साजरा होणा-या दिवाळी सणाचे महत्व घेऊन अनुदानित शाळांतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व कर्मचा-यांचे वेतन ३१ ऑक्टोबरपूर्वी वितरीत करणेवावत.
हे ही वाचा
👉पदोन्नतीनंतर एक वेतन वाढ देणे बाबत शासन निर्णय
👉प्राथमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स
👉शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी बाबत
👉केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 तारीख जाहीर
👉पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2024
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन दिवाळीपूर्वी करणे बाबत
👉राज्यातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजनाबाबत
👉विशेष शिक्षकांना कायम पदावर सामावून घेण्याबाबत
महोदया,
वरील विषयाचे संदर्भात विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यात दिवाळीचा सण लोक थाटामाटात साजरा करतात. सदर सणाचे महत्व जाणून राज्यातील सर्वच शाळांना जवळजवळ १५ दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या जातात. सदरचा सण अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. त्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने अधिकचा खर्च करतो.
म्हणूनच विनंती की, अशा या महत्वपूर्ण सणाच्या काळात अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी त्यांचे वेतन दिवाळीपूर्वी अर्थात ३१ ऑक्टोबर पूर्वी वितरीत होईल अशी कृपया व्यवस्था करावी.