प्राथमिक शिक्षणाधिकारी ५० हजार घेताना जाळ्यात हॉटेलसाठी हवे होते ‘शाळा बंद’चे प्रमाणपत्र district education officer
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हॉटेल सुरू करण्यासाठी
परिसरात असलेली शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि गुजराती शाळेची आरटीई मान्यता वर्धीत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना त्यांच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गन्हा दाखल करण्याचे काम सरू होते.
/ मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर येथील तक्रारदार यांना हॉटेल सुरू करावयाची होती. परंतु त्या परिसरात बंद पडलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र मागितले होते. ते मिळावे यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे अर्ज केला. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.