शिक्षण विभागांतर्गत शिक्षक संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणे बाबत disability shikshak sanvarg
संदर्भ :-
१. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडिल शासन निर्णय क्रमांक दिव्यांग-२०२२/प्र.क्र.८३/१६-अ दिनांक २० एप्रिल २०२३
२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडिल शासन निर्णय क्रमांक दिव्यांग-२०२२/प्र.क्र.८३/१६-अ दिनांक २९ जूलै २०२४
३. श्री संजय केळकर, मा. आमदार, विधान सभा, यांनी दिनांक १३.१.२०२५ रोजी या कार्यालयात आयोजीत केलेल्या सभेत दिलेल्या सूचना
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, संदर्भ क्रमांक १ अन्वये दिव्यांग कर्मचा-यांसाठी पदोन्नतीमध्ये ४% आरक्षण निश्चित करण्यात आले असून दिव्यांगाचे प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत. परंतु सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नती देणेसाठी दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित असणे आवश्यक आहे.
शिक्षण विभागांतर्गत शिक्षक संवर्गातुन विस्तार अधिकारी वर्ग-३ श्रेणी-२, विस्तार अधिकारी वर्ग-३ श्रेणी-३, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या संवर्गात पदोन्नती देण्यात येते. पदोन्नती देतेवेळी दिव्यांगांसाठी रिक्त पदांच्या ४% प्रमाणे पदे दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात येतात. परंतु दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित नसल्याने दिव्यांग कर्मचा-यांना दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही करता येत नाही.
दिव्यांगांना नियमित पदोन्नतीवेळीच राखीव जागांवर पदोन्नती देण्यात यावी, अशा प्रकारचे पत्रव्यवहार वारंवार विविध संघटनांकडून या कार्यालयास प्राप्त होत आहेत. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागांवर पदोन्नती होत नसल्याने दिव्यांग कर्मचा-यांकडून व पर्यायाने विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय मा. आमदार श्री संजय केळकर, विधानसभा यांनी शिक्षक संवर्गातील कर्मचा-यांच्या समस्या निवारणार्थ जिल्हा परिषदेत दिनांक १३.१.२०२५ रोजी आयोजीत केलेल्या सभेत दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणेसाठी पुढील योग्य ती कार्यवाही करणेबाबत या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे..
सबब शिक्षक संवर्गात दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित होणेस विनंती आहे, जेणे करुन दिव्यांगांसाठी आरक्षित पदांवर सेवाजेष्ठतेनुसार पात्र दिव्यांग कर्मचारी यांना पदोन्नती देणेची कार्यवाही करणे सुलभ होईल, ही विनंती