शिक्षकांच्या बदल्यातील संवर्ग-१ मधून सवलत घेत असलेल्या बनावट अपंगावर आक्षेप नोंदवत असलेबाबत disability certificate
विषय:-एप्रिल-मे २०२५ मध्ये होत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यातील संवर्ग-१ मधून सवलत घेत असलेल्या बनावट धडधाकट अपंगावर व संपूर्ण बदली प्रक्रीयेवर आक्षेप नोंदवत असलेबाबत…
महोदय…
उपरोक्त विषयानुसार मी वरील शाळेत काम करीत आहे. मी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बदल्यासाठी पात्र आहे. मी व अनेकांनी संवर्ग-१ मधुन अर्ज करुन लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. संवर्ग-१ मधुन बदली, बढती व बदली स्थगिती चा लाभ घेतला आहे अशा धडधाकट बनावट अपंग धारकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी न करता प्रत्यक्ष व्यक्तिची तपासणी करण्यांची मागणी अनेकदा मी व अनेकांनी प्रशासनाकडे केली आहे.
या धडधाकट बनावट अपंगामुळे माझा हक्क डावलला जात आहे. संवर्ग-१ मधून या धडधाकट बनावट अपंगांची चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत बदल्यांना स्थगिती दयावी, मी या संपूर्ण बदली प्रक्रीयेवर आक्षेप नोंदवत आहे. धडधाकट बनावट अपंगांमुळे माझ्यावर अन्याय होत आहे. स्वतः, पाल्य अपंग, पाल्य मतिमंद, गंभीर आजार, घटस्फोटीत असे प्रमाणपत्र धारकांची कसून चौकशी करत माझ् यावरील होणारा अन्याय दूर करावा ही विनंती.