Digi Locker Mobile App मधील डिजीटल कागदपत्रे ग्राहय असलेबाबत digi locker mobile application

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Digi Locker Mobile App मधील डिजीटल कागदपत्रे ग्राहय असलेबाबत digi locker mobile application

Digi Locker & mParivahan Mobile App मधील डिजीटल कायगदपत्रे ग्राहय असलेबाबत.

संदर्भ :-

१) No.NeGD/P&CEO/01/2018, Dated January 22,2018

२) MORTH No.RT-11036/64/2017-MVL, Dated the, 8th August, 2018

असे निदर्शनास येत आहे की, काही पोलीस अधिकारी कर्तव्यादरम्यान वाहन मालक / चालक यांनी त्यांचे डिजी लॉकर (Digi Locker) अॅप मधील त्यांना जारी करण्यात आलेले अनुज्ञप्ती/वाहन नोंदणी प्रमाणपत्र/वाहनाचा विमा/पी.यु.सी. यांची डिजीटल कॉपी दाखवून सुध्दा त्यांच्यावर ई-चलान कारवाई करित असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत.

केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

The Information Technology Act 2000 मधील कलम ४ व ५ मध्ये Legal recognition of electronic records and Legal recognition of digital signatures बाबत तरतूद असून एखादे कागदपत्र डिजीटली स्वाक्षरी. केली असता ते मुळ प्रत (Physical Copy) ठेवण्यासमान आहे असे नमूद आहे.

याद्वारे वाहतूक नियंत्रण शाठोतंर्गत सर्व वाहतूक विभागांचे दपोनि/प्रपोनि यांना सुवित करण्यात येते की, कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी वाहन मालक / चालक यांचेकडे अनुज्ञप्ती/वाहन नोंदणी प्रमाणपत्र/वाहनाचा विमा/पी.यु.सी. यांची मागणी केल्यानंतर वाहन मालक / चालकाने त्यांचे Digi Locker a mParivahan या मोबाईल अॅपद्वारे सदर कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरण्यात यावीत,

उपरोक्त सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.