3% DA व 3% घरभाडे भत्ता वाढ 8 महिन्यांचे स्टेटमेंट कसे जनरेट करावे ? EXCEL sheet च्यामाध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन dearness allowance hra excel sheet 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3% DA व 3% घरभाडे भत्ता वाढ 8 महिन्यांचे स्टेटमेंट कसे जनरेट करावे ? EXCEL sheet च्यामाध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन dearness allowance hra excel sheet 

*`1️⃣3% DA व 3% घरभाडे भत्ता वाढ स्टेटमेंट`*
*`2️⃣कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व पगार बिलाला जोडण्यासाठी संपूर्ण शाळेतील शिक्षकांच्या एकत्रित`*

*माझ्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो…..*

EXCEL sheet येथे पहा Click here

*कालच शासनाने 1/7/2024 पासून 3% महागाई भत्ता वाढ जाहीर केली आहे. पण फक्त महागाई भत्ता वाढणार नाही तर दि.5/02/2019 च्या शासन निर्णयानुसार…..*
*`महागाई भत्त्याची रक्कम ज्यावेळी 50% पेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्ता 30%, 20% व 10% अशा वाढीव दराने मंजूर करण्यात यावा`*
*असे स्पष्ट निदेश दिले आहेत. त्यामुळे त्या निर्णयानुसार आपला 3% DA व त्या त्या विभागानुसार HRA वाढणार आहे. आपल्या सर्व बंधूंना पगार बिलाला जोडण्यासाठी व फरक बिलाचे स्टेटमेंट मोफत प्राप्त व्हावे यासाठी हे फरक बिलाचे इंजिन बनवले आहे. यात तुम्हाला पुढील प्रमाणे स्टेटमेंट मिळतील*
*1️⃣ GPF कर्मचाऱ्यांचे 8 महिन्याचे वैयक्तिक स्टेटमेंट(जुलै 24 ते फेब्रुवारी 25)*
*2️⃣ शाळेतील सर्व GPF कर्मचाऱ्यांचे पगार बिलाला जोडण्यासाठी एका पानावर 4 याप्रमाणे सामूहिक स्टेटमेंट*
*3️⃣ NPS कर्मचाऱ्यांचे 8 महिन्याचे वैयक्तिक स्टेटमेंट (जुलै 24 ते फेब्रुवारी 25)*
*4️⃣ शाळेतील सर्व NPS कर्मचाऱ्यांचे पगार बिलाला जोडण्यासाठी एका पानावर 4 याप्रमाणे सामूहिक स्टेटमेंट*

*📜8 महिन्याचे स्टेटमेंट कसे जनरेट करावे?*

*1️⃣ स्टेटमेंट शक्यतो कॉम्प्युटर वर जनरेट करावे. मोबाईल वर जनरेट करण्यासाठी तुमच्या मोबाईल वर office 365/ google sheet/wps office यापैकी एखादे अँप डाउनलोड करावे*

*2️⃣ Information या पेज वर जाऊन पुढील माहिती भरा*
*1) तुमचे नाव*
*2) तुमच्या शाळेचे नाव*
*3) तुमचा जुलै 2024 चा बेसिक*
*4) तुमचा मिळणारा HRA 27% पेक्षा कमी असेल तर….*
*अगोदरचा HRA व आता आता वाढ झालेला HRA यात योग्य ते आकडे टाका व व सेव करा/√हे बटन दाबा*
*3️⃣ आता 53%DA – GPF किंवा 53%DA NPS या पेज वर या व तुमच्या नावाचे 8 महिन्याचे स्टेटमेंट जे तयार झाले आहे ते डाउनलोड/सेव्ह/स्क्रीन शॉर्ट काढा*
*4️⃣ याचप्रमाणे “पूर्ण शाळेचा फरक-GPF” / “पूर्ण शाळेचा फरक-NPS” या पेजवर या*
*5️⃣ शाळेचे नाव अगोदरच तुम्ही टाकले आहे. फक्त त्या त्या स्टेटमेंट मध्ये कर्मचाऱ्यांचे नाव टाका व वर BESIC च्या समोरील सेल मध्ये त्या त्या कर्मचाऱ्यांचा Basic टाका. आपोआपच एका A4 पेजवर 4 कर्मचाऱ्यांचे एकत्रित स्टेटमेंट तयार होईल. त्याची प्रिंट घ्या व नंतर पुन्हा चार कर्मचाऱ्यांची नावे टाका व प्रिंट घ्या. याप्रमाणे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एकत्रित स्टेटमेंट बनवा*
*6️⃣ यात ज्या ज्या सेल मध्ये जी माहिती भरायची आहे ते सेल अनलॉक आहेत व बाकी सर्व सेल लॉक आहेत त्यामुळे आवश्यक त्या त्या ठिकाणी तुम्ही कर्मचाऱ्यांचे नाव, शाळेचे नाव, बेसिक, HRA या बाबी भरू शकता. यासाठी कोणत्याही पासवर्ड ची गरज नाही*
*🫂जनहितार्थ जारी🫂*
*🇮🇳 जय हिंद 🇮🇳*

Join Now