दिनांक 11 डिसेंबर 2024 चा दिनविशेष days special dinvishesh
११ डिसेंबर महत्वाच्या घटना
संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकाः येथे क्लिक करा
आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुने रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
२००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
११ डिसेंबर जन्म
संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकाः येथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४३ः क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९१०)
१८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)
१८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
१८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.
१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.
१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.
१९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)
१९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.
१९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)
१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)
१९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.
१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)
१९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.
११ डिसेंबर मृत्यू
संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकाः येथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)
१९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)
१९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२३)
१९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.
१९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्मः ६ फेब्रुवारी १९१५)
२००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९०९)
२००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)
२००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्मः १६ जानेवारी १९२०)
२००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.
२०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
२०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.