आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवगातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति /गट (क्रिमीलेअर) वगळण्याबाबतचे निकष व कार्यपध्दती cremelayr non cremelayr shasan nirnay
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उव्रत आणि प्रगत व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवगातील उप्त आणि प्रगत व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळण्याबाबतचे निकष व कार्यपध्दती यांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण,
वाचा :
(१) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पसीनेल, पब्लिक व्हिन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पसौनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०१२/२२/९३-इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३
(२) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क सीबीसी-१०९४/प्र.क्र.८६/ मावक-५, दिनांक १६ जून, १९९४ (३) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग,
क सीबीसी-१०९४/प्र.क्र.८६/ मायक-५, दिनांक ५ जून, १९९७
(४) शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष
सहत्य विभाग, क्र सीबीसी-१०/ २००१/ प्र.क्र. १२०/मावक-५, दिनांक १ नोव्हेंबर, २००१ (५) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पसीनेल, पब्लिक प्रिव्हन्सेस अॅण्ड पेन्शन्स
(डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्र. ३६०३३/४/९७ इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक २५ जुलै, २००३. (६) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पसीनेल, पक्कि प्रिव्हन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन पत्र क्रमांक – ३६०३३/५/२००४-इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४
(७) शासन पत्र सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र सीबीसी-१०/ २००४/ प्र.क्र. ६८७/ मावक-५, दिनांक २९ ऑक्टोबर, २००४
(८) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क सीबीसी-१०/ २००६/ प्र.क्र. १२२/ मावक-५, दिनांक २० ऑक्टोबर, २००६.
(९) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पसीनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस अॅण्ड पेयान्स (डिपार्टमेंट ऑफ पसीनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०३३/३/२००४ इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १ ऑक्टोबर, २००८
प्रस्तावना :- मा. सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी व इतर रिट याचिका क्र. ९३०/९० च्या अनुषंगाने दि.१६/११/१९९२ रोजी दिलेल्या आदेशानुसार केंद्र शासनाने इतर मागासवर्ग प्रवर्गाकरीता क्रिमिलेअरचे तत्व मिनिस्ट्री ऑफ पर्सानेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०१२/२२/९३ इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये लागू केले आहे. केंद्र शासनाने सदर कार्यालयीन ज्ञापनान्वये इतर मागासवर्ग प्रवर्गास आरक्षणाचे फायदे देण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) देण्याच्या कार्यपध्दतीसंदर्भात निकष विहीत केलेले आहेत. तसेच सदर निकषासंदर्भात केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक १४ ऑक्टोबर, २००४ व दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ च्या कार्यालयीन पत्र व ज्ञापनान्वये वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलेले आहे. सदरहू कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेले सर्व आदेश / स्पष्टीकरण राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १६ जून, १९९४, दि. ५ जून, १९९७, दि. १ नोव्हेंबर, २००१, दि.२९ ऑक्टोबर, २००४, दि. २० ऑक्टोबर, २००६, व दि. १३ जानेवारी, २००९, दि. २७ फेब्रुवारी, २००९ अन्वये तसेच दिनांक २२ जानेवारी, २०१३ च्या शासन पत्रान्वये अंमलात आणले आहेत.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम २००१, (सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून उर्वरित विमुक्त जाती व भटक्या जमातीसह इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत तसेच उन्नत व प्रगत व्यक्ति गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन- क्रिमिलेअर) प्रमाणपत्रे देण्याच्या कार्यपध्दतीबाबत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व शासन निर्णय / परिपत्रक / पत्र याद्वारे वेळोवेळी ज्या सूचना / आदेश देण्यात आले आहेत त्या सर्व शासन निर्णय / शासन परिपत्रक शासन पत्र यांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
3
शासन परिपत्रक: वरील वाचा येथील शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्रान्वय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलिअर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत तसेच उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्रे निर्गमित करण्याच्या कार्यपध्दती संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्व शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन ज्ञापनांचे / शासन पत्रांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण करुन सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक असे अद्ययावत आदेश या शासन परिपत्रकान्वये देण्यात येत आहेत.
२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या प्रमाणपत्राच्या वेधतेचा कालावधी आणि सदर प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति गट यामध्ये मोडत नसल्याच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या वेधतेचा कालावधी याबाबत पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबांवण्यात यावी.
(i) एखादा उमेदवार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि दिशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छित असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्याला / तीला विहित नमुन्यातील ” विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र आणि उन्नत आणि प्रगत गट/ व्यक्ति यामध्ये मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र” सादर करणे आवश्यक आहे. (ii
) एखाद्या उमेदवाराची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर भागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणानुसार नियुक्ती करतांना नियुक्ती प्राधिका-याने सदर उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करावी आणि सदर उमेदवार विहित केलेल्या विशिष्ट निर्णायक (crucial) तारखेस उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गटात मोडत नसल्याची पडताळणी करावी.
(iii) एखाद्या पदाकरीता अर्ज दाखल करावयाची / स्विकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरीता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक (crucial) तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात यावी.
(iv) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा घेण्यास अपात्र असलेल्या एखाद्या उमेदवारास सदर आरक्षणाचा फायदा घेता येऊ नये याची दक्षता घेण्याकरीता सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्या उमेदवारास निर्गमित करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातीमध्ये असल्याबाबतचे आणि उन्नत आणि प्रगत गट / व्यक्ति यामध्ये मोडत नसल्याबाबतचे एक शपथपत्र संबंधित उमेदवाराकडून घेण्यात
यावे. (याबाबतचा शपथपत्राचा नमुना परिशिष्ट “ब” व परिशिष्ट “क” येथे जोडण्यात आला आहे.)
३. सोबतच्या परिशिष्ट – “अ” मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या व स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सर्व सक्षम प्राधिका-यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्रे (Non-Creamy Layer Certificate) देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.
४. उप विभागीय अधिकारी (महसूल) यांनी उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-Creamy
Layer Certificate) देण्याचे अमान्य केल्यास अर्ज फेटाळल्यास अर्जदारास त्या निर्णयाविरुध्द संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे ३० दिवसांच्या मुदतीत अपिल दाखल करता येईल.
५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेब साईटवर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २०१३०३२५१५३९१२९३२२ असा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
अर्जासोबत जोडावयाच्या शपथपत्राचा नमुना) परिशिष्ट “ब”
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागासवर्ग / विशेष मागासप्रवर्गातील अर्जदाराने आरक्षणाचा फायदा मिळण्याकरीता उन्नत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबत सादर करावयाचे शपथपत्र
मी. श्री/श्रीमती कुमार /कुमारी
मुलगा यांची मुलगी
वय
जिल्हा-
-श्री.
यांचा
तहसील
येथील रहिवासी
वर्षे, व्यवसाय
गाव शहर
राज्य
असून याद्वारे दृढपूर्वक कथन करतो की, मी या जातीचा / जमातीचा असून ही जात / जमात केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस अॅण्ड पेन्सन्स डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०१२/२२/९३-इएसटोटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या संदभांत वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार / शासन निर्णयानुसार शासन सेवेतील आरक्षणाच्या फायद्याकरीता इतर मागासवर्ग प्रवर्गात गणल्या जाते. सदर जात /जमात राज्य शासनाने विहित केलेल्या मागासवर्गीयांच्या यादीमधील या प्रयगांत मोहते. मी दृढपूर्वक असेहो कथन करतो/ करते की, केंद्र शासनाच्या क्रमांक ३६०१२/२२/९३-इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ च्या कार्यालयीन ज्ञापनासोबतच्या परिशिष्टातील स्तंभ क्र-३ मध्ये नमुद केलेल्या व कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०३३/५/२००४-इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४, कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसंच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या संदभांत वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार / शासन निर्णयानुसार आरक्षणाच्या फायद्याकरीता मी विमुक्त जाती/ भटक्या जमाती इतर मागासवर्ग / विशेष मागासप्रवर्गातील उत्रत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये मी मोडत नाही.
मी दृढपुर्वक असेही कथन करतो/ करते की, माझ्या आई किंवा वडीलांचा किंवा आई आणि वडील या दोघांचाही दर्जा / उत्पन्न हे ३१ मार्च २० रोजी संपणाऱ्या आर्थिकवर्ष अखेरीस वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शनीनुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति गट (क्रिमिलेअर) यांच्याकरीता असलेल्या मर्यादेमध्ये मोडते.
उमेदवाराचे नांव व स्वाक्षरी
दिनांक-
(उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी न केलेले शपथपत्र / खुलासा रद्दबातल ठरविण्यात येईल.)
(सूचनाः- सदरहू आरक्षणाचा फायदा हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून तो उमेदवाराने जात प्रमाणपत्र / उत्रत व प्रगत गट / व्यक्ति यामध्ये मोडत नसल्यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या पडताळणीसंदर्भात विहीत केलेल्या कार्यपध्दतीच्या अधिन राहिल. जर उमेदवाराने इतर मागसवर्ग प्रवर्गात मोडत असल्याबाबत किंवा उन्नत व प्रगत गट / व्यक्ति यामध्ये मोडत नसल्यासंदर्भात संबंधित अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पुरावे पडताळणीअंति खोटे अथवा बनावट आढळल्यास कोणतीही पूर्व सुचना किंवा कोणतीही कारणमिमांसा न देता त्या उमेदवारास देण्यात आलेला आरक्षण विषयक फायदा कायमस्वरुपी रद्दबातल ठरविण्यात येईल. तसेच सदर प्रकरणी संबंधित उमेदवारास जवाबदार धरण्यात येऊन खोटे अथवा बनावट कागदपत्र / पुरावे दाखल केल्याबद्दल त्याच्या विरुध्द भारतीय दंड विधान कायद्यानुसार विहीत कलेली कारवाई करण्यात येईल.)
३२
(अर्जासोबत जोडावयाच्या शपथपत्राचा नमुना)
परिशिष्ट “क”
केंद्र शासनाच्या इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या अर्जदाराने आरक्षणाचा फायदा मिळण्याकरीता उञ्जत
व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबत सादर करावयाचे शपथपत्र
मी, श्री/श्रीमती/ कुमार /कुमारी
-श्री.
यांचा
मुलगा / यांची मुलगी वय वर्ष, व्यवसाय गाव शहर तहसील
जिल्हा- असून याद्वारे दृढपुर्वक कथन करतो की, मी राज्य येथील रहिवासी या जातीचा जमातीचा असून ही जात ।
जमात केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस अॅण्ड पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पसौनेल अॅण्ड ट्रेनिंग)
कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०१२/२२/९३-इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार शासन सेवेतील आरक्षणाच्या फायद्याकरीता इतर मागासवर्ग प्रवर्गात गणल्या जाते. भी दृढपुर्वक असेही कथन करतो/ करते की, केंद्र शासनाच्या क्रमांक ३६०१२/२२/९३-इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ च्या कार्यालयीन ज्ञापनासोबतच्या परिशिष्टातील स्तंभ क्र-३ मध्ये नमूद केलेल्या व कार्यालयीन ज्ञापन क्रमांक ३६०३३/५/२००४-इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४, कार्यालयीन ज्ञापन क्रमांक- ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या अद्ययावत परिपत्रक / सूचनेनुसार (Notification) शासन सेवेनोल आरक्षणाच्या फायद्याकरीता मी इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये मी मोडत नाही.
मी दृढपुर्वक असेही कथन करतो/ करते की, माझ्या आई किंवा वडीलांचा किवा आई आणि वडील या दोघांचाही
दर्जा / उत्पन्न हे ३१ मार्च २० रोजी संपणाऱ्या आर्थिकवर्ष अखेरीस वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तीनुसार
इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यांच्याकरीता असलेल्या मयांदेमध्ये मोडते.
उमेदवाराचे नांव व स्वाक्षरी
स्थळ- दिनांक –
उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी न केलेले शपथपत्र / खुलासा रद्दबातल ठरविण्यात येईल.
(सूचनाः- सदरहू आरक्षणाचा फायदा हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून तो उमेदवाराने जात प्रमाणपत्र / उन्नत व प्रगत गट /
व्यक्ति यामध्ये मोडत नसल्यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांच्या पडताळणीसंदर्भात विहोत केलेल्या