शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी,औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा common entrance exam
जाहीर सूचना
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी
अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४
(पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत घेण्यात
आली आहे.
सदरील परीक्षाची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर प्रसिध्द करण्यात आलेले प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास (Objection Tracking) पोर्टलवर जावून प्रति अक्षेप रुपये १०००/- भरुन खालील नमुद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.