सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ आचारसंहिता 6 जून पर्यंत लागु राहील code of conduct
संदर्भ – मा. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडील परिपत्रक N०.४३७/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ Dated १६/०३/२०२४
वरील संदर्भीय विषयान्वये मा. भारत निवडणूक आयोगाने दि.१६/०३/२०२४ च्या प्रसिध्दिपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम घोषित केलेला असून आदर्श आचारसंहिता दिनांक १६/०३/२०२४ पासून लागू झालेली असून, आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत लागू राहील, असे निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने दिनांक ०६ जून २०२४ पर्यंत आचारसंहिता लागू राहील. आचारसंहितेबाबत मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.