मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व अतिरिक्त माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत cm yuva karya traning yojana
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता तयार करण्यात आलेल्या अतिरिक्त माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
प्रस्तावना:-राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता संदर्भाधीन दि. ०९.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
सदर योजनेचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याद्वारे प्रथम मंजूर करण्यात आलेल्या २१,९५,२१,१००/- इतक्या रकमेच्या माध्यम आराखड्यास संदर्भाधीन दि. ०२.०९.२०२४ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता वित्त विभागाकडून ₹७५.०० कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार अतिरिक्त माध्यम आराखडा तयार करण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास कळविण्यात आले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रस्तुत योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी २७३,०३,०१,०००/- इतक्या रकमेचा अतिरिक्त माध्यम आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास “माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या” दि. १३.०९.२०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने महासंचालनालयाकडून मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त माध्यम आराखड्यास तसेच सदर आराखडा राबविण्याकरीता आवश्यक खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेल्या अतिरिक्त माध्यम आराखड्यास व सदर आराखडा राबविण्याकरीता ₹७३,०३,०१,०००/- (रत्र्याहत्तर कोटी तीन लक्ष एक हजार फक्त) (GST सह) इतक्या खर्चास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
मान्यताप्राप्त अतिरिक्त माध्यम आराखड्यास येणाऱ्या अंदाजित खर्चाच्या तपशीलाबाबतचे परिशिष्ट-अ सोबत जोडले आहे.
२ माहिती व जनसंपर्क संचालनालयाने संबंधित जाहिरात एजन्सी/आस्थापनांना कार्यादेश देण्याबाबत पुढील कार्यवाही करावी. प्रस्तुत प्रसिद्धी कार्यक्रमाची सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि. २९.०७.२०२४ च्या व या विभागाच्या संदर्भाधीन दि. ०२.०९.२०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेला प्रसिद्धी कार्यक्रम यांत द्विरुक्ती होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
३. उक्त अतिरिक्त माध्यम आराखडा योग्य रितीने अंमलात आणला जाईल, याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची (DGIPR) ची राहील. जाहिरात खर्चाची देयके मा. सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांना सादर करण्यात यावीत.
देयकांबाबत कार्यवाही करताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि. १३.०९.२०२४ च्या बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन करावे,
४. प्रस्तुत योजनेचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यासाठी खर्च करताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/आदेश / परिपत्रके तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र- २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये निर्गमित केलेल्या वित्तिय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील तरतूदी/अटी व शर्तीचे पालन करावे.
५. प्रस्तुत प्रयोजनासाठी येणारा खर्च लेखाशिर्ष, मागणी क्र. झेडए-०२, २२३०-कामगार व सेवायोजन, ०२ सेवायोजन, ००४ संशोधन, सर्वेक्षण व सांख्यिकी, (०१) (०१) सेवायोजन रोजगार उपलब्धताविषयक माहिती व युवक रोजगार विषयक सेवा (२२३० ११०७), २६ जाहिरात व प्रसिद्धी या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा,
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२३१४५४५९२७०३ असा आहे. हा निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.