मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचामार्फ़त राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्याबाबत संबोधन cm video conferencing for copy mukt
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (राज्य मंडळ) यांच्यामार्फत राज्यात इयत्ता १० वी व इयत्ता १२ च्या बोर्ड परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षांच्या पार्श्वभुमीवर राज्यभर “कॉपीमुक्त परीक्षा अभियान” राबविण्यात येणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभुमीवर मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य दि.११.०२.२०२५ रोजी सकाळी १२.३० वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दृक-श्राव्य माध्यमाद्वारे (Video Conference) संबोधित करणार आहेत. तरी, त्याअनुषंगाने संबंधित सर्व अधिकारी यांना Video Conference साठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, ही विनंती.
सदर बैठकिची लिंक आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी आपल्या स्तरावर तयार करून स्वतंत्रपणे ई-मेल द्वारे सर्व संबंधितांना पाठविण्यात यावी, हि विनंती.