पी.एम.श्री.च्या धरतीवर केंद्रीय शाळांना सी.एम.श्री. शाळा निवडीबाबत cm shree selection upkram 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पी.एम.श्री.च्या धरतीवर केंद्रीय शाळांना सी.एम.श्री. शाळा निवडीबाबत cm shree selection upkram 

संदर्भः- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचे दि. २१/०१/२०२५ रोजीच्या बैठकीतील निर्देश.

उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, केंद्रीय शाळांचो फेरसंरचना सन २०२४ २५ मध्ये करण्यात आली आहे. सदर फेरसंरचनेमध्ये काही जिल्हयातील केंद्रीय शाळा बदलून नवीन शाळा ही केंद्रीय शाळा प्रस्तावित केली आहे. ही बाब लक्षात घेऊन पी.एम.श्री. च्या धर्तीवर केंद्रीय शाळांना सो.एम.श्री. शाळा म्हणून निवड करावयाची आहे. सी.एम.श्री. शाळांची निवड करतांना त्या केंद्रातील इतर शाळा किवा केंद्रशाळा आदर्श शाळा किवा पी.एम. श्री शाळा या योजनेत अंतर्भूत असल्यास सदर केंद्राकरीता सी.एम.श्री शाळा प्रस्तावित करण्यात येऊ नये,

सी.एम.श्री.शाळांची निवड करतांना सदर शाळेस खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध असाव्यात.

१. केंद्रशाळा निवडतांना सदरची शाळा ही इतर शाळांसाठी दळणवळण सोयीयुक्त असावी.

२. सदर शाळेस आवश्यक त्या भौतिक सुविधा विकसीत करण्यासाठी पुरेशी जागा असावी.

३. सदर शाळेतील विदयार्थी संख्या पुरेशी असावी.

४.सी.एम.श्री. शाळा विकसीत केल्यास व दळणवळ णाच्या वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोणकोणत्या गावातील विदयार्थी येऊ शकतोल बाचा आराखाडा तयार करावा.

तरी केंद्रशाळा ही सी.एम.श्री. शाळा म्हणून निवड करतांना वरील बाबीचा अभ्यास करून सदरचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी दि.२९/०१/२०२५ पर्यंत संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करावा.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरचा प्रस्ताव आवश्यक त्या सर्व बाबीची तपासणी करून आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव संचालनालयास दि.३१/०१/२०२५ पर्यंत सादर करावा. यास विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी व यासाठी पुनश्चः पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.

Join Now