मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (CMYKPY) नोंदणी पोर्टल सुरु; ऑनलाईन नोंदणी करा cm maza ladka bhau Yojana 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (CMYKPY) नोंदणी पोर्टल सुरु; ऑनलाईन नोंदणी करा cm maza ladka bhau Yojana 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना शासन निर्णय येथे पहा➡️➡️➡️ pdf download to click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक येथे पहा ➡️➡️➡️click here to registration 

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शासन निर्णय :राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल, रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

१.१

या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.

१.२ बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.

१.३ लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना /महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना /उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक

पृष्ठ १६ पैकी २

शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३

वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेंतर्गत पात्र आस्थापना / उद्योग यांची यादी परीशिष्ट-अ मध्ये नमूद आहे.

१.४ शासकीय / निमशासकीय आस्थापना / उद्योग / महामंडळाची सबंधित तालुका /जिल्हा/विभाग/ राज्यस्तरीय कार्यालये या योजनेंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील.

१.५ रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल.

२. सदर योजनेकरीता उमेदवाराची पात्रता खालिलप्रमाणे असेल :२.१ उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

२.२ उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका / पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत

Leave a Comment