‘क्लास मी’ सुविधांवर चर्चा, ॲप देणार सर्व अपडेट पालकांना रोज समजणार पाल्याची माहिती class me app
शाळेत झालेल्या अध्यापनासह घरी दिलेल्या अभ्यासाबाबत पालकांना रोज माहिती मिळणार आहे. ‘क्लास मी’ या अॅपद्वारे ही सुविधा प्रत्येक पालकाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात पालक मेळाव्यात चर्चा होवून त्याचा वापर करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे, उपाध्यक्ष प्रा. टी. एस. ढोली, सचिवएस. बी. देशमुख, ‘क्लास मी’अॅपचे संचालक कैलास लोणारे,आदींसह शिक्षक-पालक संघ
पदाधिकारी, शालेय समितीचे अधिकारी आणि पालक, शिक्षक
उपस्थित होते. वर्षभरात राबवल्या
जाणाऱ्या उपक्रमांवर चर्चा झाली. शाळेत विषयानुसार झालेल्या अध्यापन, लेखन, कलाकृती याची माहिती अॅपवर शिक्षकांकडून टाकली जाणार आहे. याशिवाय कोणत्या विषयाचा काय अभ्यास घरी करावयाचा आहे. याची माहितीही अॅपवर टाकली जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रगती समजण्यासाठी कोणता अभ्यास करणे बाकी आहे, काय अपुर्ण आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे. याबाबत पालकांना रोज माहिती मिळणार आहे.
मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा विद्यार्थ्यांची शैक्षणिक शैक्षणिक . मांडला गुणवत्ता
बालक या सर्वांच्या मदतीने आपण आपल्या पाल्याची गुणवत्ता सातत्याने वाढीसाठी प्रयत्न करू असे सांगितले. राहुल सोनवणे यांनी पाल्यास पुढील शैक्षणिक आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करावयाचे असेल तर आपल्या पाल्याशी सुसंवाद साधून त्याच्या येणाऱ्या शैक्षणिक अडचणी सोडव मदत करण्याचे आवाहन केले. प्रा. ढोली यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी पडू नये यासाठी आपण विद्यालयात नवनवीन शैक्षणिक बदल व तंत्रज्ञानाची ओळख करून देत असल्याचे सांगितले.
क्लास मी’चे कार्य
‘क्लास मी’ अॅपवर शिक्षक सूचनाही टाकू शकतील. ही सर्व माहिती पालकांना अॅपवर समजू शकेल. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचे कामकाजव पाल्याची प्रगती याची रोज माहिती पालकांना उपलब्ध होणार आहे. गुणवत्ता वाढीसाठी या अॅपचा उपयोग होवू शकेल अशी माहिती पालकांना देण्यात आली. अॅपच्या प्रकल्प व्यवस्थापक मनीषा गोळेसर यांनी अॅपची माहिती पालक मेळाव्यात दिली. हे अॅप पालकांना मोबाईलमध्ये टाकावे लागणार आहे. ते विद्यालयाकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.