इ १० वी १२ वी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर class 10th,12th board exam timetable declared 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ १० वी १२ वी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर class 10th,12th board exam timetable declared 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४ विषय- फेब्रुवारी-मार्च २०२५ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा अंतिम वेळापत्रकाबाबत

प्रकटन

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेची लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी, २०२५ ते गुरूवार दि. २९ फेब्रुवारी, २०२५ व इ. १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. ०२ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक ०२/११/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे

वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment