राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची परिपूर्णरीतीने अंमलबजावणी करणेबाबत child protection in school
संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२४३/एस.डी.-४ दि.२१.८.२०२४
२. मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. आस्था-अ/प्राथ-१०६/वि.सु परिपूर्ण अंम/२०२४/५६०४ दि.१०.०९.२०२४ (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयी संदर्भिय शासन निर्णय व पत्र अवलोकनी घ्यावे.
विद्यार्थी सुरक्षा विषयी उपाययोजना बाबत सध्या सर्वत्र कार्यवाही सुरु आहे. याकामी संदर्भ क्र.१ नुसार शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. संदर्भिय शासन निर्णयामधील सूचनांमध्ये प्रामुख्याने :
१. शाळा व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
२. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे
३. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये तक्रार पेटी बसविणे
४. सखी सावित्री समिती बाबत तरतुदींचे अनुकलन करणे आणि
५. विद्यार्थी सुरक्षा समितीचे स्थानिक पातळीवर गठन करणे
या संदर्भात क्षेत्रीय पातळीवर करावयाच्या वरील मुद्यावरुन कार्यवाही संबंधित मा. आयुक्त (शिक्षण) यांनी घेतलेल्या दिनांक २.९.२०२४ च्या व्ही. सी. मध्ये तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत.
उपरोक्त नमूद सुरक्षा विषयी मुख्यत्वे पाच मुद्यावर शाळांमध्ये कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. या संदर्भात वरील प्रमाणे आपण सादर केलेली माहिती मा. आयुक्तालयास सादर केलेली आहे.
संदर्भिय क्रमांक २ चे पत्रान्वये दिलेल्या सूचनेन्वये, आपल्या कार्यक्षेत्रातील विषयांकित प्रकरणाचे ज्या मुद्यांबाबत सुरक्षेच्या दृष्टीने पूर्तता करणे अद्याप बाकी आहे त्या सर्व मुद्यांची परिपूर्ण रीतीने अंमलबजावणी होईल याबाबत स्थानिक
पातळीवर पाठपुरावा व पूर्ततेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात यावी. या विषयासंबंधात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच याविषयी नेमणूक केलेल्या संपर्क अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक अहवालासोबत सादर करावा.