शाळेत सीसीटीव्ही,तक्रारपेटी,विद्यार्थी सुरक्षा समिती सक्तीची अंमलबजावणी न केल्यास मान्यता,वेतन रोखणार child protection committee
जालना: शालेय परिसरात घडणाऱ्या अनुचित घटना, मुलींच्या सुरक्षिततेबाबत सजगता यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती तरतुदीचे पालन यासह विद्यार्थी सुरक्षा समिती गठित करून एका महिन्यात मुख्याध्यापकांना अहवाल सादर करावा लागणार आहे. सदर बाबतीत हलगर्जीपणा केल्यास संबंधित शाळेची मान्यता आणि वेतन रोखण्यात येईल, असेही बुधवारी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे, हे विशेष…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे
अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी. शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल
मुख्याध्यापकाने आठवड्यातून किम ान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रुम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.
शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक, इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेम णुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक
शालेय शिक्षण विभागात विद्यार्थी सुरक्षिततेबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळांनी संबंधित आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सीसीटीव्ही, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करून तातडीने अहवाल शिक्षण विभागाला सादर करावेत.