विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने बदली/पदस्थापनेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य chief of state election commission
संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.
०२. उक्त पत्रान्वये मा. भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या / पदस्थापना संबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत. आपल्या विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा. मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबीची बदल्या / पदस्थापना करतांना विशेष दक्षता घेण्यात यावी. ०३. मा. भारत निवडणूक आयोगाला यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पर्यंत अहवाल सादर करावयाचा असल्याने या सर्व बदल्या / पदस्थापनांबाबतची कार्यवाही दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा, तसेच त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी.
०४. मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक ०६.०८.२०२४ ते ३०.०८.२०२४ या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरिक्षण कार्यक्रमाशी संबंधीत अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करतांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या परि. ७ चे काटेकोरपणे पालन व्हावे. 04. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, ही विनंती.