जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सकाळच्या शाळेची वेळ बदलण्याबाबत change school timetable
रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सकाळच्या शाळेची वेळ बदलण्याबाबत.
संदर्भ :-१. शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४, दि. ८/२/२०२४ २. मा. संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक २०/१/२०२४रोजीच्या
व्हिडीओ कॉन्फरन्स सुचना ३. या कार्यालयाकडिल पत्र जा.क्र. राजिप/शिक्षण/प्राथ/आस्था १२/ ३०८८/२४, दिनांक ०२/०५/२०२४
४. या कार्यालयाकडिल पत्र या कार्यालयाकडिल पत्र जा.क्र. राजिप/ शिक्षण/ प्राथ/आस्था १२/४१२७/२४, दिनांक २६/०६/२०२४
५. सर्व प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा रायगड यांचे कडिल पत्र दिनांक ८/१०/२०२४ ६. सर्व प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हास्तरीय बैठक दिनांक ८/१०/२०२४
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ नुसार सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरविण्याबाबत निर्देश जारी केलेले आहेत. तसेच संदर्भ क्र. २ नुसार मा. संचालक (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्यातील शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरविण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
संदर्भिय पत्र क्र.३ अन्वये शनिवार व इतर सकाळच्या शाळेच्या दिवशी शाळेची वेळ सकाळी ७.०० ते ११.३० अशी करणेत आलेली होती. परंतु संदर्भ क्र. १ व २ अन्वये शनिवार व इतर सकाळच्या शाळेची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.३० अशी करणेत आलेली होती. परंतु संदर्भिय पत्र क्र. ५ अन्वये सर्व प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा रायगड यांच्या पत्रान्वये शनिवारच्या शाळेची वेळ सकाळी ७ ते १०.३० अशी करणेबाबत मागणी करणेत आलेली आहे. परंतु दिनांक ८/१०/२०२४ रोजी झालेल्या प्राथमिक शिक्षक संघटनांच्या झालेल्या बैठकीनुसार शनिवार व इतर सकाळच्या शाळेची वेळ सकाळी ७.३० ते ११.०० अशी करणेबाबत
सुचित करणेत आलेले आहे. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांची शनिवार व इतर सकाळच्या शाळेची वेळ सकाळी ७.३० ते ११.०० अशी करण्यात येत आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये अध्यापनाच्या तासिका कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाहीत याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांची राहील ही नोंद घ्यावी. तसेच आपल्या अधिनस्त रायगड जिल्हा व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शाळांना आपल्या स्तरावरुन कळविणेत यावे.
शाळेच्या वेळेबाबत परिपत्रक येथे पहा Click here