विदयार्थ्यांचा जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इ. यांच्यामध्ये दुरुस्तीसाठी लागणारी कागदपत्रे change name caste birthdate
विदयार्थ्यांचा जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इ. यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेशकामी सादर करावयाच्या कागदपत्राबाबत..
वाचाः-१. महाराष्ट्र खाजगी शाळा संहिता नियम १९८६ चे नियम २६.४ अन्वये
२. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासननिर्णय क्र. एसएसएन/१००९ (४०६/०९)/माशि-२
दि.२४/०२/२०१०
३. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ कलम ३ (१) अन्वये लोकसेवा घोषित
विद्यार्थी नाव जात व जन्मतारखेत बदल करण्याकरिता शासन माहितीपत्रक येथे पहा
विषयांकीत प्रकरणी उक्त संदर्भिय पत्रानुसार या परिपत्रकान्वये कळविणेत येते की, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद अहमदनगर विभागाच्या अधिनस्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा मधील विदयार्थ्यांचा जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इ. यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेश मिळणेकामी प्रस्ताव या कार्यालयास सादर केले जातात. त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत याबाबत परिपत्रक निर्गमित करणे संदर्भ क्र.०३ नुसार गरजेचे आहेत.
प्रस्तावसोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
१. विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे
बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) जे नाव दुरुस्त करुन पाहिजेत त्या नावाचे विदयार्थ्यांचा आधारकार्ड, आईचे, आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, विदयार्थ्यांचा जन्मदाखला अथवा महाराष्ट्र शासन राजपत्र
२. विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०३ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल विदयार्थ्यांचा जातीचा दाखला (६) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल पालकांचा जातीचा दाखला
३. विदयार्थ्यांची जन्मतारिख/जन्मठिकाण दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०१ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचेथे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नावासहीत जन्मदाखला
(६) विदयार्थ्यांचा इ.१ ली,४ थी व ७ वी चे निर्गम उतारा
४. विदयार्थ्यांच्या पालकांचे नाव व आडनाव बदल बाबत (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार)
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) दुय्यम निबंधक कार्यालयाकडील दत्तकविधानपत्र (७) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल (८) आईचे पुर्नविवाह नोंदणी प्रमाणपत्र (९) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड
५. विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावणे बाबत
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल व निकालामध्ये सदर विदयार्थ्यांची कस्टडीयन आईकडे असणे आवश्यक आहे (७) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड
उपरोक्त प्रस्तावामधील सर्व कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक यांनी पडताळणी करुन साक्षांकीत करुन जोडणे आवश्यक आहे तसेच. प्रस्तावाची एक प्रत शाळेच्या दप्तरी कायम ठेवणेत यावी. जे विदयार्थी शाळेमध्ये शिकत नसेल त्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती करता येत नाही याची नोंद घ्यावी. वरिल प्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करुन सदरचा मंजुरी आदेश सात दिवसात या कार्यालयातुन घेवुन जाणे संदर्भ क्र.०३ नुसार आवश्यक आहे. तसेच इ.११ वी १२ च्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव मा शिक्षण उपसंचालक पुणे यांचेकडे सादर करावे. या कार्यालयास सादर करु नये. व या कार्यालयास दुरुस्तीबाबतथा प्रस्ताव परस्पर पालकांना देवुन कोणीही पाठवु नये. याबाबत दक्षता घ्यावी. सदरचे परिपत्रक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू राहील.