दि.२९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी ‘APAAR दिवस’ साजरा करणेबाबत Celebration of APAAR Day
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/3488 दिनांक : 26 NOV 2024
विषयः सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी ‘APAAR दिवस’ साजरा करणेबाबत.
संदर्भ :
१) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. N०.१-२७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४. २) कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/
२०२४-२५/२८८१ दि. २५/०९/२०२४. उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ‘APAAR दिवस’ साजरा करण्यात यावा.
सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये
विशेष मोहिम राबविण्यात यावी. जिल्हा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या
मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना दयावा. दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रशासनाधिकारी मनपा, गटशिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार
करण्याची कार्यवाहीचा आढावा घ्यावा. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे APAAR आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे.
(आर. विमला, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई. Celebrating APAAR Day Celebration of APAAR Day
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.