शाळा स्तरावर करावयाच्या विविध उपयोजना बाबत गुड टच बॅड टच तसेच सीसीटिव्ही बसवणेबाबत cctv update in school
संदर्भ :- 1 )मान . शिक्षण आयुक्त यांनी दिलेल्या सूचना .
2) शासन निर्णय दि . 21 ऑगस्ट 2024
आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांकडून खालील बाबीची पूर्तता करून घ्यावी तसेच याबाबत सर्व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक जिल्हास्तरावर घेण्याचे नियोजित आहे तारीख लवकरच कळविण्यात येईल .
👉👉शाळा स्तरावरील समित्या स्थापन करणे बाबत pdf download
1) सर्वच शाळानी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये रजिस्ट्रेशन करून सर्व माहिती पूर्ण भरून फायनल करावयाचे आहे परंतु काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मनपा अंतर्गत असलेल्या शाळा यांनी अद्याप पर्यंत नोंदणी केलेली दिसून येत नाही त्या सर्व शाळांनी तात्काळ नोंदणी करून माहिती नोंदवून शाळा फायनल करावयाच्या आहेत .
2) **सर्व शाळांमध्ये शाळास्तरावरील सर्व समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका घेऊन इतिवृत्त अद्यावत करावयाचे आहे प्राधान्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सखी सावित्री समिती , विशाखा समिती, परिवहन समिती तक्रारपेटी, तंबाखू नियंत्रण सीसीटीव्ही ,आदींची कार्यवाही तात्काळ व्हावी.
3) शाळेच्या दर्शनी भागावर चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 आणि 112 हा कायमस्वरूपी रंगविण्याबाबत आपणास वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही काही शाळांमध्ये याचा वापर झालेला नाही तसेच हा नंबर कशासाठी, कोणत्या परिस्थितीत वापरावा याची विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. प्रत्येक सोमवारी परिपाठात बालविवाह प्रतीबंधक प्रतिज्ञा घेण्यात यावी .शाळा स्तरावर विशेषत : मुलींसाठी थ्रो बॉल खेळाचे मैदान तयार करावे , मुलींना जाणीवपूर्वक तेथे खेळण्याची संधी द्यावी . बाल हक्क सुरक्षा कायदा व सखी सावित्री समिती, विशाखा समिती तसेच नवीन सर्व जीआर शाळा स्तरावर संग्रही असणे आवश्यक आहे प्रत्येक शिक्षकाला त्याची माहिती असावी.
हे ही वाचा
👉👉राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ अपडेट
👉👉आयकर परतावा कधीपर्यंत मिळेल चेक करा
👉👉पगाराच्या 50 टक्के पेन्शन केंद्र सरकारचा निर्णय
👉👉शाळेमध्ये सीसीटीव्ही तक्रार पेटी व सुरक्षा समिती सक्तीची
4) शाळेतील सर्व कर्मचारी व बाहेरील स्त्रोताकडून नेमण्यात आलेले सर्व कर्मचारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर संग्रही ठेवावे .
5) मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना शाळेत अद्यावत असाव्यात. विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच अर्थातच सुरक्षित स्पर्शचे ज्ञान असणे आवश्यक आहे शिक्षकांनी त्यांना जाणीवपूर्वक याचे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती करून द्यावी .
6) शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस शाळेबाहेर बऱ्याच वेळेस अनोळखी मुले मुलींसाठी काही धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतात त्यासाठी आपल्या शाळेच्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा दामिनी पथकास पत्र देऊन कळवाव्यात आणि त्यांना या ठिकाणी यावेळेस राऊंड घेण्यास पत्र द्यावे. प्रत्येक महिन्यात शाळास्तरावर पालकांच्या बैठका घ्याव्यात त्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांनी गुणवत्ता विकसन बाबत माहिती द्यावी तसेच विद्यार्थ्यांच्या काही समस्या असल्यास त्याही पालकासमोर मांडाव्यात .
7) आपल्या शाळेतील विद्यार्थी मुले अथवा मुली पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस सतत गैरहजर राहत असतील तर त्याबाबत पालक भेटी घेऊन त्यांच्या गैरहजेरीच्या कारणांचा शोध घ्यावा व आपल्या पातळीवर समस्येचे निरसन करावे . त्या विद्यार्थ्याचा बालविवाह ठरत नाही ना याबाबत जागरूक राहावे , तशी परिस्थिती असल्यास पालकांचे प्रबोधन करावे व त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त करावे .
8) शाळेच्या दर्शनी भागावर किंवा मुख्याध्यापक कक्षा समोर विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी लावावी आणि विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी ,समस्या या लिखित स्वरूपात निनावी टाकण्यास सांगावे आठवड्यातून एक दिवस या तक्रारींचा निपटारा करावा ज्या तक्रारी मुख्याध्यापक पातळीवर सोडविणे शक्य नाही अशांचा पत्रव्यवहार जिल्हा कार्यालयाशी करावा
9) मुलांसाठी , मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी पाणी व्यवस्था करावी तसेच महिला कर्मचारी यांना मधल्या सुट्टीच्या वेळेस तेथे उपस्थित ठेवावे .
10) शालेय पोषण आहार दर्जेदार देण्यात यावा शालेय पातळीवर तयार करण्यात आलेल्या परसबागेतील भाज्यांचा त्यात वापर करावा .
11) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनचे रजिस्ट्रेशन करून सोमवार पर्यंत फायनल करावेत त्यानंतर मूल्यांकन समिती आपल्या शाळेस भेट देऊन मूल्यांकन करणार आहे.
12) महावाचन महोत्सव आपल्या शाळेत राबविण्यात यावा. घेतलेल्या उपक्रमातून नंबर काढून तालुका स्तरावर कळवायचे आहे.
13) शासनाकडून भाषा, गणित ,विज्ञान आदिसाठी साहित्य पेट्या पुरविलेल्या आहेत ज्या शाळांना या पेट्या प्राप्त झालेल्या आहेत त्यांनी साहित्याची विषयवार ,घटक निहाय मांडणी करून तो घटक शिकवताना वर्गात अध्ययन अध्यापन साहित्यासह शिकवावे . विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तेत सातत्य ठेवणे यासाठी या अध्यापन साहित्याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो आणि असा होणे यासाठी मुख्याध्यापक यांनी आपल्या सर्व शिक्षकांना विचारात घेऊन साहित्याचे वाटप करावे .
14) आपल्या शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्वच शाळा स्तरावरील कर्मचारी यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे .
15) आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढून घेऊन ते अपलोड करावे व सर्व विद्यार्थ्यांचे व्हॅलेडेशन पूर्ण करावे
16) शालेय अभिलेखे यांना पृष्ठांकन करून प्रमाणित करावेत
17) आपली शाळा नावारूपाला येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
18) शाळेतील सर्वच बाबीसाठी प्राधान्याने मुख्याध्यापक यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी.