सीसीटीव्ही कॅमेरे,तक्रारपेटी,सखी सावित्री समिती प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयके न स्विकारण्याबाबत cctv complaint box and committee
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तक्रारपेटी बसविणे, सखी सावित्री समिती गठीत करणे व विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणे बाबत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयके न स्विकारण्याबाबत.
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. संकीर्ण १११७/प्र.क्र.८०/एस.एम.१ दि.०५.०५.२०१७
२. शासन निर्णय क्रं. संकीर्ण २०२२/प्र.क्र.३९/एसडी-४ दि.१०.०३.२०२२
३. शासन निर्णय क्रं. सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२४३/एस.डी-४ दि.२१.०८.२०२४
हे ही वाचा
👉👉या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संवर्ग नियतकालिक बदल्याबाबत शासन निर्णय
👉👉सीसीटीव्ही तक्रार पेटी व सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत
👉👉इयत्ता दहावी बारावी जून जुलै मध्ये झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणे बाबत
👉👉वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावणे बाबत
👉👉YCMOU शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
उपरोक्त संदर्भिय क्रं. १ चे शासन निर्णयात नमुद केल्यानुसार तक्रार पेटी बसवुन पुढील आवश्यक ती कार्यवाही शाळा स्तरावर करण्याबाबत तेसच उपरोक्त संदर्भ क्रं. २ चे शासन निर्णयात नमुद केल्यानुसार शाळा स्तरावर “सखी सावित्री” समिती गठण करण्याबाबत तसेच संदर्भ क्रं. ३ चे शासन निर्णयानुसार शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणे बाबत तथा शासन निर्णयाच्या दिनांकापासुन एक महिन्याचे आंत सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या बाबत सदर शासन निर्णयात नमुद केल्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात आलेले आहे. परंतू अद्याप बऱ्याच शाळांनी सदरची कार्यवाही पुर्ण केलेले नाही.
करीता उपरोक्त संदर्भीय क्रं. १ ते ३ चे शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही केल्याबाबत प्रमाणपत्र माहे सप्टेंबर-२०२४ चे वेतनदेयका सोबत घेण्यात यावे. सदरचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शाळांचे माहे सप्टेंबर- २०२४ चे वेतन देयके स्विकारण्यात येवू नयेत.