संवर्ग ०१ जिल्हा अंतर्गत बदली निकष व प्रक्रिया cadore one 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Cadore one
Cadore one

संवर्ग ०१ जिल्हा अंतर्गत बदली निकष व प्रक्रिया cadore one 

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थेंलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत) खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थैलेसेमिया विकारग्रस्त असलेले.

संवर्ग ०१ साठी निकष pdf येथे पहा pdf download

दि०७/०४/२०२१ चा शासन निर्णय येथे पहा सर्व निकषासंबंधी शासन निर्णयpdf download 

Leave a Comment