शिक्षिकेचा कारनामा : बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र फसवणुकीचा गुन्हा दाखल चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रकार bogas disability’ certificate 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षिकेचा कारनामा : बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र फसवणुकीचा गुन्हा दाखल चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रकार bogas disability’ certificate 

ता. प्रतिनिधी / २० मार्च चांदुर रेल्वे : २०२२ मध्ये

संवर्ग १ मधुन बदलीचा लाभमिळविण्याकरिता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करुन प्रशासनाची दिशाभुल केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या तत्कालीन सहाय्यक शिक्षिका ज्योती कृष्णराव बरडे यांच्याविरूध्द चांदूर रेल्वे पोलीसांत गुरूवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

ज्योती बरडे या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव (कसबा)

येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या कार्यरत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ज्योती कृष्णराव बरडे ह्या चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाणच्या पुर्व माध्यमिक शाळेत सन २०२२ मध्ये कार्यरत होत्या. अशातच २०२२ च्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग-१ मधुन बदलीचा लाभ मिळविण्याकरिता त्यांनी अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची

दिशाभुल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

विभागीय खाते चौकशीमध्ये ज्योती बरडे यांनी प्रशासनाची दिशाभुल केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चांदुर रेल्वे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) विनय देशमुख यांनी याबाबत चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दिली. यावरून चांदूर रेल्वे पोलीसांनी सहाय्यक शिक्षिका ज्योती कृष्णराव बरडे यांच्याविरूध्द भादंवी कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.

Join Now