सवलत हवी, १५०० रुपये द्या अन् दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र घ्या! सवलतीच्या हव्यासापोटी गैरमार्गाचा वापर bogas disability’ certificate
रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता : सवलतीच्या हव्यासापोटी अनेकजण करताहेत गैरमार्गाचा वापर
खामगाव : दिव्यांग नसतानाही केवळ
१५०० रुपये देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवता येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रमाणपत्रांची रचना मूळ प्रमाणपत्रासारखीच असल्याने सहज ओळख पटत नाही. त्यामुळे यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बोगस प्रमाणपत्रांच्या मदतीने सरकारी सवलतींचा गैरवापर केला जातो, तसेच खरे दिव्यांग लाभार्थी त्यांच्या हक्कांपासून वंचित राहू शकतात. वास्तविक, दिव्यांग व्यक्तींनाच या सवलती मिळायला हव्यात, मात्र बोगस प्रमाणपत्रांमुळे लाभ चुकीच्या व्यक्तींना मिळत आहे. त्यामुळे या गैरप्रकाराची मुळे किती खोलवर आहेत, याचा शोध घेणे प्रशासनासाठी आवश्यक बनले आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
१००
बोगम कार्ड तयार करून संबंधित व्ययक्तीला पौडीएफ स्वरूपात त्याच्या व्हॉट्सअॅपवर मिळते. त्या पीडीएफ फाईलवरून खामगाव शहरातील कोणत्याही झेरॉक्स सेंटरमध्ये १०० रुपयांमध्ये
दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार उघड
दिव्यांग प्रमाणपत्र सत्यता पडताळणी दरम्यान, सामान्य रुग्णालयातील डॉ. योगेश सिंधीकर यांनी काही प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त केला. तपासणीअंती ती बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने २० मार्च रोजी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
क्यूआर कोड बनविण्यासाठी हायटेक पद्धतीचा वापर!
प्रमाणपत्रावर दिव्यांगाची माहिती खरी आहे, याकरिता क्यूआर कोड देण्यात येतो. बोगस प्रमाणपत्रांवर हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड तयार केला जातो. स्कॅन केल्यावर संबंधित व्यक्तीचे संपूर्ण तपशील दर्शविले जातात, त्यामुळे प्रमाणपत्र खरे असल्याचा भास होतो. ही अत्याधुनिक फसवणूक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करत आहे. एसटी प्रवासात तिकीट दसत सवलत मिळविण्यासाठी बोगस प्रमाणपत्र काढणान्यांचे प्रमाण वाढले.
स्वाक्षरी आणि शिक्काही बनावट, फाँटही संशयास्पद
दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील डॉ. योगेश सिंथीकर व डॉ. श्रीकांत लांजूडकर यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के प्रमाणपत्रांवर असतात. मात्र, बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांनी या दोघांच्या स्वाक्षऱ्या व शिक्क्यांची हुबेहूब नक्कल केल्याचे उघड झाले आहे. तसेच, प्रमाणपत्राचा फाँटही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शोधमोहीम राबविण्याची गरज आहे.
चुकीच्या पद्धतीने व बनवाबनवी करून दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याच्या मागे लागू नये. असे कुणी निदर्शनास आल्यास तक्रार करावी. तक्रारीनंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल.
डॉ. नीलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक, खामगाव