पाचवी व आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पढील वर्गात प्रवेश board exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाचवी व आठवीच्या तीन विषयांच्या दोनदा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पढील वर्गात प्रवेश board exam

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांच्या केंद्रीय स्तरावरील संकलित मूल्यमापन आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

शासकीय, अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा, इंग्रजी, गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी (२) घेतली जाणार आहे. त्यातच यंदापासून या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षाही होणार आहे. वार्षिक परीक्षा होणार असल्याने पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचे महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

Board exam
Board exam

Leave a Comment