शिक्षकांसाठी ब्लेंडेड मोड कोर्स (certificate) प्रमाणपत्र बाबत अपडेट blended course certificate download 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांसाठी ब्लेंडेड मोड कोर्स (certificate) प्रमाणपत्र बाबत अपडेट blended course certificate download 

STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत..

संदर्भ : १. STARS प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५

२) STARS प्रकल्प मान्यता मंडळ इतिवृत्त सन २०२४-२५ दि.३१ जानेवारी २०२४

३. प्रस्तुत कार्यालयाची मंजूर टिपणी दि. ३०/०९/२०२४

ब्लेंडेड कोर्स संभाव्य उत्तर सूची येथे पहा 

 

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ ३ तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकायनि सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

ब्लेंडेड कोर्स संपूर्ण शासन निर्णय pdf इथे पहा 

त्यानुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि.२०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि.२१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एकदिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे. उपलब्ध कोर्स पूर्ण करणेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे.

ब्लेंडेड कोर्स साठी सर्व लिंक येथे पहा 

* शिक्षकांसाठी सूचना :

1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील

शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.

2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक

असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व तो पूर्ण करू शकतात.

ब्लेंडेड कोर्स पूर्ण करण्यासाठी दीक्षा ॲप लिंक इथे पहा

3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तर क्रोर्स साठी मोंदणी करावी.

4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाय्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करावी.

5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.

6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्व

ब्लेंडेड कोर्स certificate प्रमाणपत्र बाबत अपडेट

You have successfully completed this course. The certification will be issued to you within 10 days.

प्रमाणपत्र बाबत महत्त्वाची सूचना तुम्ही हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. 10 दिवसांच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र जारी केले जाईल.

व्हिडिओ पाहून झाल्यावरच्च मूल्यमापनासाठी प्रश्न उपलब्ध होतील,

7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक दिवसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे.

8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० ताल ग्राह्य धरण्यात येतील,

9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद

सेवा पुस्तकात घेण्यात येईल.

10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील,

* गटसाधन केंद्र/शहर साधन केंद्र (BRC /URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी:

1. राज्यस्तर/जिल्हास्तर वरून प्राप्त झालेल्या ब्लेंडेड कोर्स संदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे.

2. आपल्या बीआरसी/युआरसी कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्सला नोंदणी करण्यासंदर्भातील

पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे,

3. ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय व्हाट्सअप गट तयार करून कोर्स बाबत वेळोवेळी

मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे.

4. वरिष्ठ स्तरावरून कोर्स संदर्भातील आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार PLC चे आयोजन करणे,

5. पीएलसी च्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पीएलसी पूर्ण करणे. 6. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.

* ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांची भूमिका :

प्रोत्साहन देणे.

1. शिक्षकांनी ब्लेंडेड कोर्स करण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे व शिक्षकांना

2. ब्लेंडेड कोर्स संदर्भात नांदणी, कोर्स माहिती, PL.C माहिती बाचत केंद्र स्तरावर उड़ोचन सत्र आयोजन करणे,

3 बलेंडेड कोर्स मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख ग्राना सूचित करणे

4. ब्लेंडेड कोर्स शिक्षकांच्या सीपीडी साठी तयार करण्यात आलेला असून जे शिक्षक कोर्स पूर्ण करतील त्यांच्या

प्रमाणपत्राची नोंद आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेकडून सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करणे

5. जिलास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने तालुकास्तरीय पीएलसीला भेटी देण्याचे नियोजन करणे.

* ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिका:

1. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकापर्यंत प्रसारित करणे,

2. ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्वयक

माणून नेमून त्यांच्यावर जिल्हयाची जयावदारी सोपविणे. 3. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/JRC पर्वत

पोहोचवणे,

4. ब्लेंडेड कोर्स संदर्भात जिल्हास्तरीय आढावा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे,

5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुयवात पीएलसी थे

नियोजन व आयोजन करणे,

6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे.

उक्त नमूद सर्व बाबीच्या अधीन राहून प्राचार्य, जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना कोर्सेस पूर्ण करणेसाठी योग्य समन्वय साधाथा,