स्वामी विवेकानंद अंध विद्यालय येथील विद्यार्थ्यांसोबत: राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांचा वाढदिवस साजरा birthday celebration
स्वामी विवेकानंद अंध विद्यालय ,परतवाडा येथील मुलांना जेवण देऊन त्यांच्याच हस्ते केक कापून त्यांच्या आनंदात साजरा केला प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे सर यांनी आपला वाढदिवस…….
आदरणीय महेश ठाकरे सर हे एक असे व्यक्तिमत्व आहे की शिक्षकांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होणारे तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी जागृत असणारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व होय कोणतेही काम असेल त्यासाठी सतत पाठपुरावा करणारे आदरणीय महेश ठाकरे सर यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त सरांना आदरणीय सरांना लाख लाख शुभेच्छा.
आदरणीय सरांच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न असेल थकीत वेतनाचा प्रश्न असेल तसेच वैद्यकीय बिलांचा प्रश्न असेल नवनी शिक्षकांचा प्रश्न असेल अशैक्षणिक कामाच्या विरुद्ध लढा असेल ते सोडवण्यासाठी श्री महेश ठाकरे सर नेहमी तत्पर असतात.
जिल्हा अंतर्गत बदली तसेच जिल्हा बदलीतील शिक्षकांसाठी नेहमी धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे महेश ठाकरे सर शिक्षकांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व कसे असावे तर आदरणीय महेश ठाकरे सरांसारखे असले पाहिजे.
कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक प्रश्न असतील तर ते जिल्हास्तरावर विभाग स्तरावर राज्यस्तरावर सोडवण्यासाठी सर नेहमीच तत्पर असतात सरांचा सर्व राज्यांमध्ये मोठा संपर्क आहे तसेच सर वेळोवेळी प्रत्येकाला वेळ देखील देतात अनेक कामेही दूरध्वनीच्या माध्यमातून सरांनी केलेली आहेत ज्या ज्या वेळी शिक्षकांवर अन्याय होतो त्या त्यावेळी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांच्या माध्यमातून होते.
आदरणीय सरांच्या कामाचा मला आलेला एक छोटासा अनुभव 2020 मध्ये आंतरजिल्हा बदल्या झाल्या आणि बऱ्याच ठिकाणी शिक्षकांना कार्यमुक्त न करता अनेक जिल्हा परिषदा मनमानी करत होत्या तसेच काही शिक्षक कार्यमुक्त झाले होते परंतु त्यांना रुजू करून घेण्यात आले नव्हते हा प्रश्न ज्यावेळेस सरांना सांगण्यात आला त्यावेळेस सरांनी या सर्व बाबींचा पाठपुरावा करून आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून राज्यस्तरावरून सचिवामार्फत ग्रामविकास विभागाचे पत्र निर्गमित करण्यास भाग पाडले व या पत्रानुसार सर्व शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे व कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना तात्काळ जिल्हा परिषद मध्ये रुजू करून घेण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आला तो आदरणीय महेश ठाकरे यांच्या माध्यमातून होय.
सरांकडे प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष पद आहे आणि सर हे पद समर्थपणे पेलावत आहेत सरांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत तसेच सरांना अनेक शिक्षकांचा पाठिंबा देखील आहे सरांचे कार्य हे खूप मोठे आहे.
सरांच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक म्हणजे सरांनी आपला स्वतःचा वाढदिवस देखील एक साध्या पद्धतीने आणि गरीब दिव्यांग मुलांच्या सोबत साजरा केला. समाजातील गोरगरीब तसेच दिव्यांग मुलाविषयीची तळमळ यातून दिसून येते
अशा या व्यक्तिमत्त्वाला माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.