राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२४-२५ अन्वये “भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धाचे”आयोजन करणेबाबत bhumika abhinay loknrutya competition 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२४-२५ अन्वये “भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धाचे”आयोजन करणेबाबत bhumika abhinay loknrutya competition

संदर्भ : १. NCERT, नवी दिल्ली यांचे पत्र F.No.८-२/२०२४-२५/DESS/PEP/७२ दि.१३/०५/२०२४.

उपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये, राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प मान्य कृती आराखडा सन २०२४-२५ नुसार लोकसंख्या शिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात कळविले आहे. कृती आराखडा घटक क्र.४. नुसार Curricular Activities मध्ये जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. सदर दोन्ही स्पर्धा या शाळास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर नियोजित आहेत. सदर स्पर्धा सर्व शासकीय (शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, समाजकल्याण, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, KGBV शाळा व्यवस्थापनाच्या) शाळेतील विद्यार्थ्यासाठी आहेत. सदर स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणेः

भूमिका अभिनय सादरीकरण विषय :

१. निरोगी वाढ

२. पौष्टिक आहार व आरोग्य

३. वैयक्तिक सुरक्षा (शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक)

४. इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता

५. अंमली पदार्थाचा गैरवापर, त्याची कारणे आणि प्रतिबंध.

भूमिका अभिनय स्पर्धा नियमः

१. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांचाच सहभाग असावा.

२. सादरीकरण शालेय गणवेशातच करणे बंधनकारक आहे.

३. वेळ-५ ते ६ मि.

४. विद्यार्थी संख्या ४ ते ५.

५. शिक्षक संख्या-२ (मुलीचा सहभाग असेल तर एक पुरुष व एक महिला शिक्षिका असाव्यात.)

६. स्पर्धेचे माध्यम केवळ हिंदी किंवा इंग्रजी.

७. शाळेत दिव्यांग विद्यार्थी असल्यास किमान एकाला तरी प्राधान्य द्यावे.

लोकनृत्य स्पर्धेसाठी सादरीकरणाचे विषय :

१) मुले व मुलीं यांच्यासाठी संधीची समानता.

२) मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका

३) पर्यावरण संरक्षण (Refuse, Reduce, Reuse & Recycle)

४) मादक द्रव्यांचे सेवन रोखणे.

५) पौगंडावस्थेतील निरोगी नातेसंबंध.

लोकनृत्य स्पर्धेसाठी नियम :

१) इयत्ता ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांचाच सहभाग असावा.

२) सादरीकरणासाठी वेशभूषा, केशभूषा विषयास अनुसरून असावी.

३) वेळ : ५ ते ६ मि.

४) विद्यार्थी संख्या ४ ते ६

५) शिक्षक संख्या २ (मुलीचा सहभाग असेल तर एक पुरुष व एक महिला शिक्षिका असाव्यात.)

६) भाषा: स्थानिक (Local Language)

(राष्ट्रीय स्तरावर स्क्रिप्ट मात्र हिंदी किंवा इंग्रजी भाषेत परीक्षकांना देणे आवश्यक आहे.)

७) शाळेत दिव्यांग विद्यार्थी असल्यास किमान एकाला तरी प्राधान्य द्यावे,

सर्वसाधारण सूचना :

१. लोकनृत्य व भूमिका अभिनय सादरीकरण करताना कोणत्याही धर्म, जात, पंथ, राष्ट्रपुरुष, थोर संत यांचा अनादर नाही याची दक्षता घ्यावी.

२) जिल्हास्तरावरील स्पर्धेत प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळेल याची दक्षता घ्यावी.

३) दोन्ही स्पर्धाना स्थानिक पातळीवर उचित प्रसिद्धी द्यावी व कोणत्याही शाळेतील संघ किंवा विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी सर्व शाळांपर्यंत स्पर्धेची माहिती द्यावी.

४) प्रत्येक स्पर्धेसाठी तीन परीक्षक असावेत. त्यामध्ये १. प्राचार्य, DIET किंवा शिक्षणाधिकारी २. स्पर्धेमध्ये सहभागी नसलेल्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा लोकसंख्या शिक्षण विषयातील तज्ञ ३. कला, नृत्य

अभिनय या विषयांतील तज्ञ यांचा समावेश असावा.

सदर स्पर्धाचे आयोजन खालील कालावधीत करण्यात यावे.

सदर स्पर्धा शाळा, तालुका, जिल्हास्तरावर आयोजित करून प्रत्येक स्तरावर भूमिका अभिनय स्पर्धेतून एक संघ व लोकनृत्य स्पर्धेतून एक संघ पुढील स्तरावर पाठवावा. जिल्हास्तरावर दोन्ही स्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण करावे. जिल्हास्तरावर दोन्ही गटातून प्रथम क्रमांक आलेले दोन संघ जे विभाग स्तरासाठी पात्र ठरतील, त्यांची यादी खाली दिलेल्या विहित नमुन्यात स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तात्काळ विनाविलंब दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागस्तरीय स्पर्धेसाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण किंवा संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मेलवर पाठविण्यात यावी. तद्नंतर विभागस्तरीय स्पर्धा आयोजन करून दोन्ही स्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण करावे तसेच दोन्ही गटातून प्रथम क्रमांक आलेले दोन संघ जे राज्य स्तरासाठी पात्र ठरतील, त्यांची यादी खाली दिलेल्या विहित नमुन्यात स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तात्काळ विनाविलंब दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रस्तुत कार्यालयातील सामाजिक

शास्त्र विभागाच्या socialsciencedept@maa.ac.in मेलवर पाठविण्यात यावी.

जिल्हास्तर व विभागस्तर लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धाच्या आयोजनासाठी लवकरच निधी वितरीत करण्यात येईल. सदर निधीचा विनियोग करण्याचे निकष पुढीलप्रमाणे असतील.

निधीचा विनियोग मार्गदर्शक सूचनाः

जिल्हास्तरः

१. जिल्हास्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रत्येकी ७००० रुपये असे एकूण १४००० रुपये एवढा निधी प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला वितरीत करण्यात येईल.

२. सदर निधीमधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यास ३०० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यास २०० रुपये व तृतीय क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांस १५० रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून त्यांच्या बैंक खात्यावर जमा करण्यात यावी. भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा या दोन्ही स्पर्धेसाठी बक्षीस वितरण याचप्रमाणे करण्यात यावे. मात्र प्रथम आलेला संघच विभाग स्तरावर प्रतिनिधित्व करेल.

३. जिल्हास्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा यासाठी प्रतिस्पर्धा प्रतिपरीक्षक ५०० रुपये मानधन दोन परीक्षक यांच्यासाठी अनुज्ञेय असेल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी तृतीय परीक्षक म्हणून कामकाज पाहतील मात्र त्यांचे मानधन अनुज्ञेय असणार नाही.

४. सदर निधीमधून चहा व अल्पोपहार यासाठी २००० रुपये अनुज्ञेय असेल.

५. सदर निधीमधून सादिल म्हणून ७५० रुपये अनुज्ञेय असेल.

विभागस्तर :

१. विभागस्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रति जिल्हा १४००० रुपये याप्रमाणे सहभागी होणाऱ्या जिल्ह्यांच्या संख्येच्या प्रमाणात निधी विभागस्तरावर आयोजन करणाऱ्या प्रत्येक प्रादेशिक विद्या प्राधिकरण किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला वितरीत करण्यात येईल.

२. सदर निधीमधून विभागस्तरावर प्रथम क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यास ४०० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यास २५० रुपये व तृतीय क्रमांकाच्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांस १७५ रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी. भूमिका अभिनय

व लोकनृत्य स्पर्धा या दोन्ही स्पर्धेसाठी बक्षीस वितरण याच प्रमाणे करण्यात यावे. ३. सदर निधीमधून विभागस्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा यासाठी प्रति स्पर्धा प्रतिपरीक्षक

५०० रुपये मानधन दोन परीक्षक यांच्यासाठी अनुज्ञेय असेल. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मधील अधिकारी तृतीय परीक्षक म्हणून कामकाज पाहतील मात्र त्यांचे मानधन अनुज्ञेय असणार नाही.

४. सदर निधीमधून विभागस्तरावर भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा स्थळी येणे व जाणेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी प्रवास खर्च अनुज्ञेय असेल. सदर प्रवास खर्चात प्रत्यक्षात एस. टी. तिकीट खर्च अदा करण्यात यावा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांच्या समवेत शाळेतील एक पुरुष व एक महिला असे दोन शिक्षक असावेत.

५. सदर निधीमधून सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी प्रति व्यक्ती चहा व अल्पोपहार

यासाठी १२० रुपये अनुज्ञेय असेल,

६. उपरोक्त खर्च वजा जाता शिल्लक निधीचा विनियोग आकस्मिक खर्चासाठी सदर प्रादेशिक विद्या प्राधिकरण किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना करता येईल.

सदर स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तात्काळ २ दिवसात आर्थिक खर्च नस्ती आवश्यक देयकासह आपल्या कार्यालयात जतन करून ठेवण्यात यावी. तसेच खर्च अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र प्रस्तुत कार्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या socialsciencedept@maa.ac.in या मेल आयडी वर सादर करण्यात यावी.

सोबतः लोकसंख्या शिक्षण विभाग, NCERT, नवी दिल्ली यांनी निर्गमित केलेल्या लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा मार्गदर्शक सूचना जोडल्या आहेत.

शासन निर्णय pdf download